लॉकडाऊनमुळे तृतीयपंथीयावर उपासमारीची वेळ आली. दुकानातून, रेल्वे प्रवाश्यांकडून पैसे मागून आपली गुजराण करणाऱ्या तृतीयपंथियाना रस्ता निर्मनुष्य असल्या कारणाने पैसे मागणे बंद झाले आहे. पर्यायी व्यवसाय करावा तर समाजही उपेक्षीची वागणूक देतो. अशा परिस्थितीत आलेल्या संकटाचा सामना करणे कठीण झाले आहे.