•   Thursday, August 14
पश्चिम महाराष्ट्र

दर्शनाच्या हत्येचे कारण स्पष्ट; पोलिसांनी मित्र राहुलला केली अटक

मागील आठवडल्यात राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यानंतर दर्शना हिचा बेपत्ता मित्र राहुल हंडोरे याच्याकडे संशय होता. दरम्यान, या प्रकरणी आरोपी राहुल हंडोरेला मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.


दर्शना हिचा मृतदेह आढळल्यापासून राहुल बेपत्ता होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. दर्शनाच्या डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले होते. त्यामुळे तिची हत्या राहुल याने केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पोलिसांच्या तपासानुसार, राहुल हांडोरेचं शेवटचं लोकेशन कात्रज होतं. त्यानंतर दोन दिवसांनी तो गायब झाला होता. पुण्यातून गायब झाल्यानंतर दोन दिवसांनी नवी दिल्लीतील एटीएम सेंटरवरुन त्याच्या एटीएम कार्डवरुन पैसे काढण्यात आले. रविवारी रात्री उशिरा त्यानं त्याच्या एका नातेवाईकाशी फोनवरुन संवाद साधला होता. एका मित्राशी वाद झाल्याने पुणे सोडलं असल्याचं तो म्हणाले. त्यानंतर त्याने फोन बंद केला आणि त्याच्या फोनचं लोकेशन ट्रेस केलं असता ते कोलकाता होतं. त्यानंतर पोलिसांनी राहुलला मुंबईतून अटक केली आहे.

दर्शना आणि राहुल एकमेकांचे नातेवाईक होते. दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परीक्षा देत होते. दर्शना आधी एमपीएससी उत्तार्ण होऊन ती लवकरच वन विभागात रुजू होणार होती. त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, असा आग्रह धरला. तो देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल, असे दर्शना आणि तिच्या कुटुंबियांना सांगितले. मात्र, त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहुलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली.