Salute to the people working for social welfare during the #COVID19 pandemic
कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक हात बेरोजगार झाले. उपजीविकेचा प्रश्न उभा ठाकला. या काळात महापौर संदीप जोशी यांच्यासारख्या समाजसेवेची कणव असलेला माणूस कसा स्वस्थ बसणार? युवा झेप प्रतिष्ठानच्या माध्यमातून दीनदयाळ थाळीच्या वतीने खामला चौकात दोन हजार लोकांसाठी त्यांनी अन्नछत्र सुरु केले. स्वत: यात ते सेवा देऊ लागले. त्यांच्यातल्या माणसाला आणि त्यांच्या सेवाभावी कार्याला सलाम...!