सोमवारी भारताच्या गलवान परिसरात चीनने आक्रमण केले. त्यानंतर सर्वत्र चीनविरोधीसंतापाची लाट उसळली. घराघरांत चीन बद्दलचा असंतोष उफाळून आला. यात लहान मुलेही पुढे सरसावले. त्यांना प्रिय असलेली चिनीखेळणी त्यांनी तोडून आपला चीनबद्दलचा संताप व्यक्त केला.