Friday, May 3, 2024

Latest Posts

महिलांचा सन्मान ही काळाची गरज – अरुणपाल सिंग बहल  

महिला दिनानिमित्त महिला सन्मान सोहळा संपन्न

| TOR News Network | Mahila Din At Renuka College : जागतिक महिला दिनानिमित्त क्लब माय इंडिया (Club my india), रेणुका कॉलेज महिला शक्ती विचार मंच (Renuka collage mahila shakti vichar manch) आणि जीवन आधार बहुउद्देशीय  सामाजिक संस्था (Jeevan Aadhar social organization) यांच्या विद्यमाने महिला सन्मान सोहळा दिनांक 7 मार्च 2024 रोजी रेणुका कॉलेज बेसा, नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला होता. (Women’s Honor Ceremony) सदर कार्यक्रमाकरिता कामगार नेते व सामाजिक कार्यकर्ते अरुणपाल सिंग बहल कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.(Arunpal singh bahal)

या कार्यक्रमाला उद्घाटक – प्रितीताई मानमोडे भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश, प्रमुख पाहुणे – अर्पणाताई मानेकर सामाजिक कार्यकर्ता, समाजसेवक जीवन भाऊ जंजाळ , समाजसेवक पवनभाऊ पन्नासे प्रमुख वक्त्या अरुणाताई सबाने सत्कारमूर्ती प्राध्यापक विजयाताई मारोतकर आणी समाजसेविका – कल्पनाताई मानकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.सदर कार्यक्रमांमध्ये संपादिका- संध्याताई राजुरकर , समाजसेविका – वर्षा पारसे, शितल अमित पाटील , पोलीस – डिंपल नायडू आंतरराष्ट्रीय धावपटू ,वैद्यकीय डॉ. रूपा वर्मा राजकीय-  नयना झाडे या सर्व महिलांचे यांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल समाजाला जागृती निर्माण करण्यासाठी सन्मान करण्यात आला.जागतिक महिला दिनानिमित्त महिला सन्मान सोहळा तथा संविधान जागर निर्भया एक पात्री नाटक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले.

महिलांचा आदर केल तर समाज पुढे जाईल

अध्यक्ष पर भाषण करताना अरुणपाल सिंग बहल यांनी समाजामध्ये महिलांचा सन्मान करणे गरजेचे असून याबाबतचे जाणीव समाजामध्ये तथा परिवारामध्ये बालपणापासून जागृत करणे ही काळाची गरज आहे. तसेच प्रत्येक महिलांचा समाजाने आदर केला तर समाज पुढे जाऊ शकतो असे सांगितले. सन्मान केलेल्या महिलांनी आपले अनुभव समाजापुढे मांडले तसेच सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन क्लब माय इंडियाचे सदस्य तथा समाजसेवक श्री हितेश भजने यांनी केले.

Latest Posts

Don't Miss