Friday, May 3, 2024

Latest Posts

कार अपघातातून वाचलेला रिषभ पंतच्या तिहेरी भूमिकेकडे लक्ष

| TOR News Network | Punjab vs Delhi IPL 2024: डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघातातून वाचलेला रिषभ पंत कमालीची मेहनत घेऊन क्रिकेटच्या मैदानावर परतत आहे. या अपघातात त्याला झालेल्या इतर दुखापती बऱ्या झाल्या; परंतु गुडघ्याची दुखापत कधीही बरी होणार नाही अशी शक्यता होती. परंतु पंतने त्यावर मात केली. आता तो तिहेरी भूमिकेत अर्थात फलंदाजी,कर्णधार व यष्टीरक्षकाच्या रोल मध्ये दिसणार आहे.(Rishabh pant in tripple role) मात्र यष्टीरक्षणात सतत उठबस करावी लागत असल्यामुळे त्याचा गु़डघा किती सक्षम झाला आहे, हे आजच्या सामन्यातून कळून येईल. त्यामुळे भारतीय निवड समितीचेही त्याकडे लक्ष असेल. (Indian Selectors eye on Rishabh pant)

या आयपीएलमध्ये मुळात पंत खेळेल की नाही अशी शक्यता होती. खेळला तर केवळ फलंदाज म्हणून मैदानात उतरेल, असेही सांगितले जात होते; परंतु राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून त्याला पूर्णपणे हिरवा कंदील दाखवण्यात आला. परिणामी पंत आयपीएलमध्ये नेतृत्वही करणार आहे.(Green signal to pant from NCA)

आयपीएलमध्ये आज सामना होणार आहे दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात; परंतु सामन्याचा निकाल आणि त्यात योगदान देणाऱ्या खेळाडूंपेक्षा रिषभ पंतची तंदुरुस्ती, चपळता, लवचिकता आणि त्याची फटकेबाजी याकडेच सर्वांचे लक्ष असणार आहे.

दिल्ली आणि पंजाब दोन्ही संघांना गतवर्षी अपेक्षा पूर्ण करता आल्या नव्हत्या. आता काही नवीन खेळाडू संघात आल्यामुळे आणि नवी रचना झाल्यामुळे यंदा अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी दोन्ही संघ सलामीलाच जोरदार खेळ करण्याची संधी सोडणार नाहीत. असे एकीकडे चित्र असले तरी दुसरीकडे दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत सामन्यात केंद्रबिंदू असेल.

Latest Posts

Don't Miss