Friday, May 3, 2024

Latest Posts

भारतीय रेल्वेचे सुपर अ‍ॅप कमिंग सून

Indian Railway Super App : प्रवाशांना एका क्लिकवर रेल्वेच्या सर्व सोयी सुविधा मिळण्यासाठी भारतीय रेल्वे ‘ सुपर अ‍ॅप ‘ तयार करत आहे. (Railway super app coming soon) यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी लोकांना फायदा होणार आहे. रेल्वेचं तिकीट बुक करणे, रेल्वे ट्रॅक करणे, जेवण ऑर्डर करणे, तक्रार दाखल करणे आणि अशाच अनेक सुविधा या एकाच अ‍ॅपवर उपलब्ध करण्यात येणार आहेत. (All Facilities of Indian Railway on Super App)

एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यासाठी रेल्वे मंत्रालयाने 90 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रेल्वेची आयटी विंग, म्हणजेच CRIS या अ‍ॅपची निर्मिती करणार आहे. एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

काय असणार यात?

नवीन सुपर अ‍ॅपमध्ये रेल मदद, UTS, नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टीम, पोर्टरीड, सतर्क, IRCTC रेल कनेक्ट, IRCTC ई-केटरिंग, IRCTC एअर अशा कित्येक सुविधा इंटिग्रेट होणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींसाठी यूजर्सना वेगवेगळे अ‍ॅप्स घ्यावे लागणार नाहीत. तसंच, लोकांना अधिक चांगला यूजर एक्सपिरियन्स मिळणार आहे.

सध्या तिकीट बुकिंगसाठी रेल्वेचं IRCTC अ‍ॅप उपलब्ध आहे. मात्र, इतर गोष्टींसाठी प्रवाशांना विविध अ‍ॅप्स घ्यावे लागतात. नवीन सुपर अ‍ॅप लाँच झाल्यानंतर यूजर्सना केवळ एकच अ‍ॅप पुरेसं असणार आहे. 2023 या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या एकूण रेल्वे तिकीट बुकिंगपैकी सुमारे 5,60,000 बुकिंग्स या IRCTC अ‍ॅपच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या. ही संख्या एकूण बुकिंगच्या निम्मी आहे. म्हणजेच, मोठ्या प्रमाणात लोक IRCTC अ‍ॅपचा वापर करत आहेत. आता रेल्वेने इतर सुविधा देखील एकाच अ‍ॅपमध्ये दिल्यास आणखी लोकही याचा वापर सुरू करतील, असं म्हटलं जात आहे.

Latest Posts

Don't Miss