Friday, May 3, 2024

Latest Posts

केंद्र सरकार दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणार

AAP Minister Atishi Press : आम आदमी पक्षाच्या नेत्या तथा दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी शुक्रवारी एक दावा करुन खळबळ उडवून दिली आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी केंद्र सरकार दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं आहे. (In Delhi President’s rule)

आतिशी म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल सरकारच्या विरोधात खूप मोठं षड्यंत्र आखलं जात आहे. दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्लॅन केला जातोय. (plans to impose President’s rule in Delhi) नायब राज्यपाल यांनी गृह मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रावरही आतिशी यांनी नाराजी व्यक्त केली.

आतिशी यांनी शुक्रवारी सकाळी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. त्या म्हणाल्या, आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. (Information received from reliable sources) येणाऱ्या काही दिवसांमध्ये केंद्र सरकार दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणार आहे.

त्या पुढे म्हणाल्या, एका जुन्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या खासगी सचिवाला बरखास्त करण्यात आलं. सध्या केजरीवाल सरकार पाडण्यासाठी मोठं षड्यंत्र केलं जात आहे.(Big conspiracy to topple Kejriwal government) खुद्द मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खोट्या प्रकरणात अडकवून ईडीने अटक केली आहे. काहीही झालं तरी भाजपचे लोक दिल्लीमध्ये निवडणुका जिंकू शकत नाहीत, त्यामुळे केजरीवाल सरकार पाडण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

आतिशी यांनी राष्ट्रपती राजवटीसंदर्भात बोलताना म्हटलं की, अशा पद्धतीने राष्ट्रपती राजवट लागू करणं बेकायदेशीर आहे. आम आदमी पक्षाचं सरकार ज्या पद्धतीने योजना लागू करतं त्या पद्धतीने भाजप सरकार लागू करु शकत नाही. दिल्लीतील प्रत्येक महिलेला दरमहिन्यात एक हजार रुपये मिळणार आहेत. भाजपला त्यामुळे अडचण वाटत आहे. या योजनांना रोखण्यासाठी ते राजकीय षड्यंत्र आखत आहेत. मूळात दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणं बेकायदेशीर ठरेल, असं आतिशी शेवटी म्हणाल्या

Latest Posts

Don't Miss