Friday, May 3, 2024

Latest Posts

काँग्रेसकडून विशाल पाटील यांना कारवाईचा इशारा

| TOR News Network | Sangli Latest News : सांगलीतील काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरल्याने ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या समोर मोठा पेच उभा राहिला आहे. (Chandrahar Patil vs Vishal patil) यामुळे दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटील यांची काँग्रेसने हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती. यानंतर काँग्रेस विशाल पाटील यांना निलंबित करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.(Vishal Patil is likely to be suspended)

सांगलीत विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे सांगलीतील राजकारण तापलं आहे. विशाल पाटील यांच्या भूमिकेमुळे सांगलीत इंडिया आघाडीसमोर मोठा पेच उभा राहिला आहे. विशाल पाटील यांच्या बंडखोरीनंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. सांगलीचे विशाल पाटील यांना काँग्रेस निलंबित करण्याची शक्यता आहे.(Congress to suspend vishal patil)

विशाल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सांगलीत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळे काँग्रेस कारवाई करण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्यास काँग्रेस कारवाई करण्याची शक्यता आहे. (congress to take action on vishal patil) सांगलीत ठाकरे गटाने उमेदवार दिल्यामुळे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. विशाल पाटील यांच्या भूमिकेवर ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली होती.

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत आज शनिवारी सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान संजय राऊत यांनी विशाल पाटील यांच्या भूमिकेवर भाष्य केलं. (Sanjay raut on vishal patil) ‘विशाल पाटील हे समजूतदार आहेत. वसंत पाटील यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आहे. त्यांच्या कुटुंबाशी संबंध का ठेवू शकत नाही? विशाल पाटील यांची भेट का घेऊ शकत नाही? विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या मनात प्रेम आहे. विशाल पाटील यांच्या मनातही शिवसेनेविषयी प्रेम आहे , असे राऊत म्हणाले.

Latest Posts

Don't Miss