Friday, May 3, 2024

Latest Posts

Team India ची अंतिम फेरीत धडाक्यात एन्ट्री | India Entry In Finals |

श्रेयस अय्यरचे तूफानी शतकीय खेळीने आली रंगत

India vs New Zealand Cricket World Cup 2023 Semi Final: मोहम्मद शमीने टिपले ७ बळी  विराट कोहली, श्रेयस अय्यरची शतकीय खेळी सोबतच शुभमन गिलेचे अर्धशतक व त्यानंतर मोहम्मद शमीच्या घातक गोलंदाजीच्या बळावर भारताने न्यूझीलंडवर ७० धावांनी विजय नोंदवत अंतिम सामन्यात धडक दिला. या सामन्यात शमीने ७ बळी घेत नवा पराक्रम केला.तर कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत केली ‘विराट’ कामगिरी.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विजयासाठी ३९८ धावांचे डोंगरा एेवढे लक्ष्य गाठताना न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाली. मोहम्मद शमीने सलामीवीर डेव्हॉन कॉनवेला १३ व त्यानंतर भारतासाठी सर्वात घातक ठरणाऱ्या रचिन रवींद्रलाही केवळ १३ धावांवर परतावून लावले. ७.४ षटकात न्यूझीलंडचे २ गडी बाद ३९ धावा अशी स्थिती झाली. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन व डॅरिल मिशेल यांनी डाव सांभाळत संघाला १६ व्या षटकात शंभरी गाठून दिली. मिशेल व विल्यमसनने संयमी खेळी साकारत आपले अर्धशतक पूर्ण केले. दोन्ही फलंदाजांना बाद करण्यासाठी प्रयत्न सुरु असताना २८.५ षटकात जसप्रित बुमराच्या गोलंदाजीवर शमाने विल्यमसनचा सहज झेल सोडला.अशात हे दोन्ही फलंदाज भारतासाठी डोके दुखी ठरत होते.अशात मिशेलने शानदार शतक ठोकले. न्यूझीलंड आपल्या लक्ष्याकडे योग्य वाटचाल करत असताना शमीने विल्यमसनचा ३३ व्या षटकात काटा काढला. त्यानंतर त्याच षटकात त्याने टाॅम लॅथमला आल्या पावले परतावले. अशात न्यूझीलंड २२० धावांवर ४ गडी गमावून बसला होता. त्यानंतर मात्र मिशेलने संघाची बाजू सांभाळत मोठी फटकेबाजी केली व आपले शतक पूर्ण केले. ग्लेन फिलिप्सला बुमराने ४१ वर बाद काले.४३ व्या षटकात कुलदिप यादवने मार्क चॅपमनला बाद केले. ४४ व्या षटकात न्यूझीलंड ६ गडी गमावून २९९ धावांवर होता.अशात आता न्यूझीलंड विजयापासून दूर जात होता.न्यूझीलंडला ३१ चेंडूत ९६ धावांची गरज होती.४५ व्या षटकात शमीने मिशेलची खेळी संपुष्टात आणली.मिशेलने १३४ धावा केल्या. मिशेलला बाद करत शमीने आपले पाच बळी पूर्ण केले.त्यानंतर शमीचा जलवा कायम होता.त्याने अधिक दोन बळी टिपत ७ बळी घेतले.भारताने न्यूझीलंडला ३२७ धावांवर रोखत अंतिम सामन्यात धडक दिली.

त्तपूर्वी भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि एकूण ५० षटकात ४ गडी गमावत ३९७ धावा केल्या .सामना सुरु होताच कर्णधार रोहित शर्माने अक्रमक फलंदाजीला सुरुवात केली.अगदी सामन्याच्या पहिल्याच षटकात बॅक टू बॅक दोन चौकार खेचले.असाच अक्रमक पवित्रा घेत त्याने न्यूझीलंडच्या प्रत्येत गोलंदाजाचा समाचार घेतला.मात्र रोहित शर्मा आपल्या अर्धशतकापासून ३ धावा दूर असताना मोठा फटका मारण्याच्या नादात तो साऊदीचा शिकार ठरला.त्याने २९ चेंडूत ४ चौकार व ४ षटकारच्या मदतीने ४७ धावा केल्या. तर दुसऱ्या बाजूने असलेल्या शुभमन गिलनेही दमदार फलंदाजीचा नजराना पेश करत ४१ चेंडूतच आपले अर्धशतक झळकवले. भारताने १२.२ षटकातच शंभरी गाठली. शुभमनसोबत असलेल्या विराट कोहलीने मात्र सुरुवातीपासून संयमी खेळीचा पवित्रा घेतला. तर आपल्या शतकाकडे वाटचाल करणाऱ्या शुभमनला अचानक हॅमस्ट्रिंगच्या त्रासामुळे पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.कर्णधार रोहित शर्माने त्याला परत बोलावण्याचा निर्णय घेतला. आता त्याच्या जागी श्रेयस अय्यर आला. भारतीय संघाने २४ षटकानंतर १ बाद १७० धावा केल्या. शुभमनने ६५ चेंडूत नाबाद ७९ धावा केल्या. त्यानंतर श्रेयस आणि विराटने पारी सांभाळत धावफलक हालता ठेवला.विराटने या सामन्यात मोठे फटकेबाजी करणे टाळले अन् केवळ चार चौकरच्या मदतीने त्याने ५९ चेंडूत आपले यंदाच्या विश्वच।कातील ८ वे अर्धशतक पूर्ण केले.श्रेयसनेही या महत्वाच्या सामन्यात मोठी फटकेबाजी करत ४ षटकार व २ चौकारच्या मदतीने दमदार अर्धशतक ठोकले व दोन्ही फलंदाजांनी १०० धावांची भागेदारी पूर्ण केली. तर दुसऱ्या बाजूने असलेल्या विराटनेही वन डे कारकिर्दीतील ५० वे शतक पूर्ण करत त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. भारताची धावसंख्३०० होताच कोहली आणि श्रेयसने तुफानी फलंदाजी केली.अशात मात्र विराट ११७ धावांवर साऊदीचा बळी ठरला. त्यानंतर के.एल राहुल आणि श्रेयसनेही जबरदस्त खेळीचे प्रदर्शन केले.श्रेयसने केवळ ७० चेंडूत १०५ धावा करत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाचे योगदान दिले. के.एल राहुलने २० चेंडूत ३९ धावा केल्या व नाबाद राहिला.भारताने ५० षटकात ४ गडी गमावत ३९७ धावा केल्या.

Latest Posts

Don't Miss