Wednesday, May 1, 2024

Latest Posts

Sharad Pawar आणि Glenn Maxwell असा जोडला संबंध

ट्वीट करत काय म्हणाले आमदार रोहित पवार

मंगळवारी ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध द्विशतक ठोकत विश्वचषकात मोठा पराक्रम केला. मॅक्सवेलने संपूर्ण अफगाणी संघाच्या नाकेनऊ आणत आपल्या संघाला अफलातून विजय मिळवून दिला. त्याच्या आक्रमक फलंदाजीचे कौतुक सर्वत्र होत असताना आमदार रोहित पवार यांनी ग्लेन मॅक्सवेलचा थेट संबंघ शरद पवारांशी जोडला आहे. ( Rohit Pawar Tweet Photo of Sharad Pawar Rally In The Rain and Maxwell Innings) काय आहे त्या ट्वीट मध्ये.

मुंबाईच्या वानखेडे मैदानावर बुधावारी झालेल्या सामन्यात आॅस्ट्रॆलियाच्या मॅक्सवेलने अफगाणीस्तानला चांगेच झाडपले. त्याने नाबाद 201 धावांची उत्कृष्ट खेळी साकारत स्टार आॅफ द मॅच ठरला. त्याने 21 चौकार आणि 10 षटकार खेचत द्विशतक तर केलेच मात्र संघावर ओढवलेल्या संकाटून बाहेर देखील काढले. त्यांची ही खेळी आयसीसीच्या इतिहासात अजरामर ठरली.मॅक्सवेलच्या याच तूफानी खेळाचा संबंध समाज माध्यमांवर सक्रिय असलेल्या आमदार रोहित पवार यांनी जोडला आहे.त्यांनी ट्वीट करत शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसातील सभेचा फोटो आणि मॅक्सवेलचा फोटा ट्वीट केला आहे.त्यात रोहित पवार यांनी सध्याच्या राज्यातील परिस्थितीवर भाष्य केले आहे.ते म्हणाले परिस्थिती कितीही विरोधात असली आणि मैदानात ‘योद्धा’ जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागते. नुसतं लढावंच लागत असं नाही तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागत… अशा वेळी परिस्थितीही नक्कीच साथ देते… मग ते मैदान क्रिकेटचं असो की राजकीय! हेच काल ग्लेन मॅक्सवेलनं दाखवून दिलं..या ट्विटला आता दोन्ही बाजूंनी  प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी टीक केली असून काही समर्थन दिले आहे. राजकारण असो की विद्यार्थी, युवकांचा प्रश्न त्यावर रोहित पवार सातत्याने भूमिका मांडत असतात. आता रोहित पवार यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी शरद पवार आणि ग्लेन मॅक्सवेलचा थेट संबंध जोडला आहे.त्या टि्वटची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Latest Posts

Don't Miss