Friday, May 3, 2024

Latest Posts

भुजबळांच्या माघारीनंतर उमेदाराचा सस्पेन्स कायम

| TOR News Network | Nashik Lok Sabha News : एकाकडे राज्यात पाच ठिकाणी मतदान झाले असले तरी महायुतीमधील अनेक जागांवर अद्याप वाद कायम आहे. काही जागांचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यात नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबई येथील लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.(Chhagan Bhujbal withdraw from the Nashik Lok Sabha) त्यामुळे नाशिकची जागा आता कोणाला मिळणार हा प्रश्न अजूनही सुटलेला नसून त्याचा सस्पेन्स कायम आहे.(Nashik Seat Allocation in Suspense)

हेमंत गोडसे की अजय बोरस्ते ?

छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय शुक्रवारी पत्रकार परिषद जाहीर केला. या जागेवर तिढा निर्माण झाल्यामुळे माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता एकीकडे ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळेल असे जवळपास निश्चित झाले आहे.(Nashik seat to shinde sena) पण, शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना की अजय बोरस्ते हा सस्पेन्स अद्याप कायम आहे. (Hemant Godse or Ajay Boraste From Nashik) मात्र दुसरीकडे भाजपने या जागेवर आपला दावा कायम ठेवल्याने गोडसे यांच्यापुढे उमेदवारीचा पेच कायम कायम आहे.

म्हणाले छगन भुजबळ ?

नाशिकच्या जागेसोबत अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाली. अमित शाह यांनी नाशिकची जागा लढवण्याचे मला सांगितले. त्यावेळी ही जागा शिवसेनेकडे असल्याचे आम्ही सांगितले. त्यानंतर अमित शाह म्हणाले की, आम्ही एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत बोलू. त्यानंतर मी काम सुरु केले, असे छगन भुजबळ म्हणाले. नाशिकमध्ये येऊन विविध घटकांशी चर्चा सुरु केली. मराठा समाज, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक विविध घटकांनी मला पाठिंबा दिला. परंतु यानंतर तीन आठवडे झाले आहेत. आता महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होऊन त्यांच्याकडून प्रचाराचा एक टप्पा पूर्ण झाला आहे. परंतु महाविकास आघाडीच्या चर्चेतून नाशिकचा प्रश्न सुटला नाही. यामुळे मी माघार घेत आहे.

Latest Posts

Don't Miss