Saturday, January 11, 2025

Latest Posts

India vs Sri Lanka: भारतीय संघाची वॉर्निंग गोलंदाजी शमी, बुमरा, सिराज ठरताहेत गेम चेंजर

शमी, बुमरा, सिराज ठरताहेत गेम चेंजर   

India vs Srilanka: भारतीय गोलंदाजांनी गुरुवारी श्रीलंके विरुध्द झालेल्या सामन्यात न भूतो न भविष्यति अशीच कामगिरी करत सर्वांना थक्क केले, आक्रमक गोलंदाजी करत अगदीच श्रीलंकेच्या फलंदाजांना बांघून बांधून मारले.अर्थातच श्रालंकेच्या फलंदाजांना एक एक धाव काढण्यासाठी सळो की पळो केले. (Indian Bowlers Gave Warning Message To Other Teams From Recent India Srilanka World Cup Match) एकंदरीतच ३२० धावांनी मिळवलेला विजय मोठा मानता जात असून यातून भविष्यातील होणाऱ्या सामन्यात मोहम्मद शमी (Mohammed Shami),जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah), मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांनी प्रतिस्पर्धी संघांना एक वॉर्निंगचा संदेश दिला आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी श्रीलंके विरुध्द झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी कमालीच्या खेळाचे प्रदर्शन केले. या महत्वपूर्ण सामन्यात फलंदाजीला आलेला सलामीवीर रोहित शर्माकडून कर्णधाराला साजेशी खेळाची अपेक्षा होती. मात्र सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूत रोहितला तंबूत रवाना करण्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांना यश आले.त्यानंतर मात्र विराट कोहली आणि शुभमन गीलने तडाखेबंद फलंदाजी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. चौफेर फटकेबाजी करत दोघांनी शतकीय भागेदारी निभवली व भारताला २९ षटकात १९३ धावांपर्यंत पोहचवले. शुभमन बाद झाल्यावर श्रेयस अय्यरने ५६ चेंडूत ८२ धावा करत आपण सूरात आल्याचे सिध्द केले. या तिघांच्या तूफानी फलंदाजीच्या बळावर भारताने ८ गडी गमावत ३५७ धावा उभारल्या. तर दुसरीकडे फलंदाजाला आलेल्या श्रीलंकेचा संघ पत्त्याच्या घरा सारखा कोसळला. भारतीय सलामीवीर रोहितला सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर बाद करणाऱ्या श्रीलंकेला बुमराने सडेतोड उत्तर देत बदला घेतला. बुमराने दुसऱ्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर पथुम निसांकाला बाद करुन आपल्या आक्रमक्तेचा परिचय दिला. दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा कर्णधार कुसल मेंडिस या फलंदाजांना सीराजने चवथ्याच षटकात घरचा रस्ता दाखवला.केवळ ३ धावांवर ४ बाद आशी दयनिय अवस्था भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेची केली.यापुढे देखील हा सीलसीला मोहम्मद शमीने कायम राखला.अगदी लयात आक्रमक मारा करत  शमीने श्रीलंकेला धरुन ठेवले आणि भारताचा विजय जवळ खेचला. ५ गडी बाद करत शमीने आपल्यातील प्रतिभेचा परत एकदा परिचय दिला आणि भारताने अवघ्या ५५ धावात श्रीलंकेला गुंडाळले. नक्कीच या विजयाने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असेलच. परंतु भारताच्या या आक्रमक गोलंदाजांनी विश्वचषकातील इतर संघांना एक वॉर्निंग सिगनल दिले आहे.यंदाचा विश्वचषक उचलण्यास उत्सुक असलेल्या भारतीय संघाला हीच लय पुढे कायम राखणे आवश्यक आहे.

Latest Posts

Don't Miss