Wednesday, January 15, 2025

Latest Posts

अक्षय शिंदे गतिमंद होता, मग तो एवढा हुशार कसा निघाला ?

| TOR News Network |

Sushma andhare Latest News: चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर विरोधकांकडून याप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. हे एन्काऊंटर होतं की हत्या असा सवाल विचारत विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांचा भडिमार करत या संपूर्ण प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला आहे. (Sushma Andhare doubt on encounter) अक्षय शिंदे हा गतीमंद आहे असं बदलापूर पोलिसांनी आधी सांगितलं होतं. जर तो गतीमंद होता, तर तो एवढा हिंस्त्र, चालाख, काही सेकंदात पिस्तुल ओढून घेण्याइतका,चपळाईने वागणारा गुन्हेगार कसा झाला, असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. (Sushma andhare on akshay shinde encounter)

अक्षय शिंदे याला शिक्षा व्हायलाच पाहिजे होती परंतु कायद्याची प्रक्रिया बायपास होता कामा नये. पहिल्या दिवसापासून पोलिसांनी हलगर्जीपणा केला. (Sushma andhare slams police)पोलिसांकडून तपास संथ गतीने सुरू होता, असा आरोप त्यांनी केला. ‘ पोलिसांनी चार्जशीट रविवारी का फाईल केली? ज्या पिस्तूलाने अक्षयने गोळी झाडली गेली ती पिस्तूल अनलोडेड असते. दोन्ही हातात बेड्या असणारा माणूस उठून, पोलिसाच्या होस्टरमध्ये ठेवलेलं पिस्तुल खेचून गोळीबार कसा करू शकतो?’ याचं उत्तर पोलिसांनी दिलं पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. (Sushma andhare doubt on police encounter)

अक्षय शिंदे याला संपवाल्याने हे प्रकरण संपत नाही. याप्रकरणातून कोणालातरी वाचवलं जातं आहे. ही संपूर्ण घटना हे राज्य प्रायोजित दहशतवाद आहे, ही फेक एन्काऊंटरची स्क्रिप्ट आहे असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. संजय शिंदे आणि इतर अधिकाऱ्यांचे निलंबन व्हायला पाहिजे.या प्रकरणाची न्यायधिषांच्या समिती कडून चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. एस आय टी स्थापन करणे म्हणजे थट्टा आहे. माझीच बॅट, माझाच बॉल असं झालं, अशी टाकाही त्यांनी केली.

 

Latest Posts

Don't Miss