Thursday, January 16, 2025

Latest Posts

सुनील केदार यांच्या अडचणीत वाढ, सत्र न्यायालयाने जामीन आणि शिक्षेला स्थगिती नाकारली

Sunil Kedar Bail Rejected : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या घोटाळ्यातील आरोपी माजी मंत्री सुनिल केदार हे सध्या नागपूरच्या काराग़ृहात आहे.आज त्यांच्या प्रकरणाची सत्र न्यायालयात सुनावणी होती.त्याचा निकाल आज पुढे आला असून त्यात केदार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सत्र न्यायालयाने त्यांना जामीन आणि शिक्षेला स्थगिती नाकारली आहे. त्यामुळे केदार यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. (District and Sessions Court reject bail of sunil kedar)

गेल्या गुरुवारच्या रात्री उशीरा माजी मंत्री सुनिल केदार यांची जेल मध्ये रवानगी करण्यात आली. (Sunil Kedar Sent To Central Jail Nagpur) त्यांना कोर्टाने आरोपी ठरवल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती.त्यामुळे त्यांना गेल्या २२ डिसेंबरपासून मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.दरम्यान सुनील केदार यांना बुधवारी (ता.२८) रात्री मेडिकलमधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. चार तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रकृती बरी असल्याचा अहवाल सादर केला.तो अहवाल फिट असल्याचा येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत, त्यांची तडकाफडकी कारागृहात रवानगी केली. गेल्या २२ डिसेंबरपासून त्यांना मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या घोटाळ्याच्या निकाल २२ डिसेंबरला देण्यात आला. निकालात पाच वर्षाची शिक्षा माजी आमदार सुनील केदार यांना ठोठावण्यात आली. याच दिवशी छातीत दुखत असल्याने त्यांना मेडिकलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.दरम्यान त्यांना मायग्रेनचा त्रास, निमोनियाचे लक्षण आढळून आले होते. ताप वाढल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. याशिवाय किडनीचाही संसर्ग झाल्याने उपचाराचा कालावधी वाढला. मात्र, डॉक्टरांनी प्रकृती स्थिरावताच, ते ‘फिट’ असल्याचा अहवाल दिला होता.दरम्यानच्या काळात लागून सुट्ट्या असल्याने सत्र न्यायालयात सुनावनी झाली नाही.पुढील सुनावनी शनिवारी दुपारी होईल असे सत्र न्यायालयाने स्पष्ट केले.त्यानुसार आज सत्र न्यायालयाने आपला निकाल दिला. यात सुनिल केदार यांच्या जामीन आणि शिक्षेला सत्र न्यायालयाने स्तगिती नाकारली आहे.त्यामुळे केदार यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

Latest Posts

Don't Miss