Monday, November 18, 2024

Latest Posts

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश

| TOR News Network | Jarange Patil Latest News Today : अंतरवली सराटीत झालेल्या दगडफेकीचे आज विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्यावरही सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील हे कट कारस्थानाची भाषा बोलत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी तर अंतरवली सराटी प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी केली आहे. यावर विधानसभा अध्यक्षांनीही याप्रकरणी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.(Bjp Demands SIT Inquiry)

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून विधानसभेत जोरदार हल्ला चढवला. (Ashish Shelar On Jarange Patil) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा उधळून लावू म्हणतात. ही भाषा वापरणारे तुम्ही आहात कोण? हा माझा सवाल आहे. कटकारस्थानाची ही योजना बनली कशी? मराठा समाजाची मोनोपॉली एका व्यक्तीला दिली का? जरांगे कुठं राहतात? तो कारखाना कुणाचा? ते दगड कुठूज आले? हे समोर यावं. अंतरवली सराटी दगडफेकप्रकरणाची एसआयटी चौकशी करा. यामागे राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये

एका गंभीर विषयाकडे आपले लक्ष वेधतो. आपण आमचे पालनहर्ता आहात. आमची सुरक्षा सांभाळणे तुमची जबाबदारी आहे. कोर्टाने काल एक टिप्पणी केली. मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. त्याबाबत कुणी तरी कोर्टात याचिका दाखल केली आहे. अशावेळी सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये. सरकारने न्यायमूर्तीची भूमिका घेतली पाहिजे. मराठा समाजाच्या भावना, मागण्या यावर दोन्ही सभागृहात दोन्ही बाजूने एकमत आहे. कायदा पण एकमताने केला आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

जरांगे यांच्या अडचणीत वाढ

दरम्यान, शेलार यांच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे.

Latest Posts

Don't Miss