Saturday, January 11, 2025

Latest Posts

विदर्भाच्या मुद्यासाठी दोन दिवस अधिवेशन वाढवा

नाना पटोले यांची विधान भवन परिसरात मागणी

Nana Patole In Winter Assembly Latest News : विदर्भाचे अनेक प्रश्न कायम आहेत.त्याचे गांभिर्य सत्ताधाऱ्यांनी ओळखावे. त्यासाठी विदर्भाच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी दोन दिवस वाढविण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलतना केली. (Nana Patole Demands Extend winter Assembly For 2 more days on Vidarbha issue)

अधिवेशनाचे दोन दिवस शिल्लक आहेत. विदर्भाचे प्रश्न आम्ही २९३ अंतर्गत सभागृहात मांडले आहेत. पण, उत्तर द्यायला मंत्री हजर नव्हते, ही बाब आम्ही अध्यक्षांच्या लक्षात आणून दिली. अध्यक्षांनीदेखील अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची भूमिका मांडली आहे. अर्थमंत्री जरी विदर्भाचा अनुशेष संपला असे सांगत असले तरी विदर्भाच्या प्रश्नांची यादी मोठी आहे. विदर्भ विकास महामंडळ कार्यरत नाही. त्यामुळे दोन दिवस अधिवेशन वाढविण्याची गरज आहे, असे नाना पटोले म्हणाले. ७८ खासदारांच्या निलंबनासंदर्भात पटोले म्हणाले,‘भाजपला लोकशाही मान्य नाही.’

विकास केला तर रथयात्रा कशाला?

मोदी सरकारने दहा वर्षांत विकास केला असेल तर त्यांना रथयात्रा काढण्याची गरज नाही. या सरकारने देशाला लुटले असून हे पाप लपविण्यासाठी रथयात्रा काढण्यात येत आहे. धार्मिकतेच्या मुद्यावर मोदी सरकार लोकांना गुंतवून ठेवत आहे, अशी टीका पटोले यांनी केंद्र सरकारवर केली.

अदानी हा सर्वांत मोठा गरीब

बहुजनांचा विकास होऊ नये, ही भाजप आणि संघाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे त्यांचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे. मोदी म्हणतात, गरीबी हीच एक जात असली पाहिजे आणि या सरकारच्या दृष्टीने अदानी हा एकमेव सर्वांत मोठा गरीब आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पात अदानी गरीब असल्यानेच इतक्या मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या आहेत, असे पटोले म्हणाले.

Latest Posts

Don't Miss