Saturday, January 11, 2025

Latest Posts

मनसेचं काही राहिलेलं नाही, मनसे हा सेटिंग वाला पक्ष

| TOR News Network |

Latest News On Raj Thackeray : महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवार यांनी सुरुवात केली, असा मोठा आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केला होता. मात्र त्यांचं हे विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना रुचलं नाही. आता मनसेकडून कोकण पदवीधर मतदार संघातून माघार घेण्यात आली आहे. त्याच पार्श्भूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अमित सरैया यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे.(Ncp Leader Amit Saraiya Slams Raj Thackeray)  मनसेचं काही राहिलेलं नाही, मनसे हा सेटिंग वाला पक्ष आहे अशी टीका सरय्या यांनी केली आहे. (MNS is Setting Party)

कोकण पदवीधर मतदार संघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून संजय मोरे,भाजप कडून निरंजन डावखरे,राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमित सरय्या रिंगणात उभे आहेत. (Amit Saraiya From kokan graduate constituency )राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमित सरय्या हेदेखील ही निवडणूक लढवणार आहेत.(Sharad Pawar Group Candidate for graduate constituency ) त्यासंदर्भात बोलताना सरय्या यांनी मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मनसेचं काही राहिलेलं नाही. मनसे हा सेटिंग वाला पक्ष आहे.(Mas Party Of Setting) मनसेच्या या भूमिकेवर लोक नाराज आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ( या निवडणुकीसाठी) कामं सुरू केली होती, पण आता माघार घेतल्याने त्यांना इतकं वाईट वाटत आहे. सकाळपासून अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क झाला, ते बोलले आम्ही त्यांचं काम करणार नाही तुम्हाला पाठिंबा देऊ, असं सरय्या म्हणाले.

गेली आठ महिने आम्ही नोंदणी करत आहोत. आमचा प्रत्येक कार्यकर्ता सिंधुदुर्ग ते पालघर या पाच जिल्ह्यात काम करत आहे. नोंदणी व्यवस्थित झाली आहे. महविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शरद पवार यांच्या ताकदीने ही निवडणूक लढवत आहे. आघाडीमधे काही बिघाड झालेला नाही. इथे एकच उमेदवार असेल, वरिष्ठ पातळीवर नेत्यांचे बोलणे सुरू आहे , असे त्यांनी सांगितले.

Latest Posts

Don't Miss