Sunday, January 12, 2025

Latest Posts

महा मेट्रो आणि मायमराठीच्या कार्यक्रमात दुमदुमली मराठी

खापरी मेट्रो स्थानकावर केला महाराष्ट्र दिवस साजरा

| TOR News Network | Maharashtra Day Celebration By Maha Metro : नागपूर : १ मे महाराष्ट्र दिन आणि राजभाषा दिनाचे औचित्य साधून महा मेट्रो नागपूर आणि मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “कविसंमेलन” हा कार्यक्रम खापरी मेट्रो स्टेशन येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या सदस्यांनी तसेच निमंत्रित कवींनी वेगवेगळ्या विषयांवर कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष ख्यातनाम लेखक कवी श्री अनिल मालोकर होते तर विशेष अतिथी महा मेट्रोचे महाव्यवस्थापक (O&M) Shri सुधाकर उराडे आणि वरिष्ठ उपमहव्यवस्थापक (CC) श्री अखिलेश हळवे उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी श्री वसंत वाहोकर, श्री उल्हास मनोहर, श्री गोपाळ कडूकर तसेच माधुरी आशिर्गडे आणि संस्थेच्या संचालक विजया मारोतकर उपस्थित होते.

विजया मारोतकर यांनी आपल्या प्रस्तावनेत उपस्थितांना संबोधित करत सांगितले कि,मराठी भाषा ही कुठल्याही बाबतीत कमी नाही, मराठीत जे भाव व्यक्त करता येतात ते इतर भाषेत नाही. मराठीत एकूण ५२ बोली भाषा आहे, प्रत्येकाची गोडी वेगळी भाव वेगळे आणि म्हणून मराठी ही भरजरी आहे, समृद्ध आहे. भाषा कुठलीही असो तरी ती संस्काराच्या संस्कृतीची आणि विकासाचा प्रभावी माध्यम आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

उपस्थित साहित्यकांना संबोधित करतांना श्री. अनिल मालकर यांनी सांगितले कि, मेट्रोने महाराष्ट्रात नागपूरचा मान वाढवला आहे. तसेच कवींनी आजच्या या कार्यक्राची शोभा वाढवली तसेच महाराष्ट्र दिन हा अशा उत्तम प्रकारे साजरा करण्यात येत असून ही आपल्या सर्वाकरता अभिमानाची बाब आहे. या ठिकाणी उपस्थित लेखिका व कवयित्री धुरंदर असून खऱ्या अर्थाने आपली मायबोली मराठीला जपण्याचे कार्य आपल्या द्वारे होत आहे ही अभिनंदनीय आहे.

कविता म्हणजे भावनांची अभिव्यक्ती मनाचे विचार योग्य शब्दात मांडता येतात त्यांना बुद्धिजीवी म्हणतात. मन शब्द बुद्धी आणि भावना यांचा समन्वय करणारी माणसे समाजात चांगले बदल घडवू शकतात असे मत श्री. वसंत वाहोकर यांनी व्यक्त केले.

यावेळी ज्या सदस्यांनी आजवर मेट्रो स्थानके पहिली नाहीत आणि मेट्रोने प्रवास केला नाही त्या सर्वांना मेट्रोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माहिती देऊन स्थानक स्थानक दाखविले या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक व मेट्रो प्रवासी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानचे सचिव मंगेश बावसे, कोषाध्यक्ष माधव शोभणे आणि इतर सदस्य उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss