Saturday, January 11, 2025

Latest Posts

अहमदाबादच्या मैदानावर कोणाची चालणार दादागिरी

अंतिम सामन्याची उत्सुक्ता शिगेला – कोण उंचवणार 2023 चा विश्वचषक

India Australia WC 2023 Final Preview : ज्या क्षणाची वाट जवळपास दीड महिना पाहिली गेली तो क्षण आता काही तासांवर आला आहे.त्यासाठी अहमदाबादचे भव्यदिव्य स्टेडियम सज्ज झाले आहे. परंतु त्या अगोदरच संपूर्ण भारतीयांमध्ये रविवारी होणाऱ्या या महत्वाच्या सामन्यात कोण बाजी मारणार याची कमालाची उत्साह शिगेला पोहचली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये कोणाची दादागिरी चालणार हे आता पुढील काही तासात स्पष्ट होणार आहे.

भारताने 1983 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने शानदार कामगिरी करत इतिहास रचला होता. यानंतर २००३ मध्ये भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. तिथे सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. ऑस्ट्रेलियाने त्यांचा 125  धावांनी पराभव केला होता. यानंतर टीम इंडियाने 2011 च्या फायनलमध्ये पोहोचून जेतेपद पटकावले.आता भारताला परत विश्वचषक जिंकण्याची संधी प्राप्त झाली आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाच वेळा तर भारताने दोन वेळा विश्वचषक जिंकला आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज असला तरी पुढील संघालाही पाच वेळा विश्वचषक जिंकण्याचा अनुभव असल्याचे भारताला लक्षात ठेवावे लागणार आहे. यंदा न्यूझीलंड सोबत झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने गोलंदाजी आणि फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली होती. मोहम्मद शमीने गेल्या सामन्यात प्रभावी गोलंदाजी करत ७ बळी टिपण्याचा विक्रम केला होता.त्यामुळे त्याला या महत्वाच्या सामन्यात आपली लय कायम ठेवण्याची गरज आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याच्याकडून आता आपेक्षा वाढल्या आहेत. तर जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराजलाही आपली ताकद दाखवावी लागणार आहे. तर फलंदाजी मध्ये रोहितचा बल्ला कर्णधाराला साजेसा असा अजून तरी दिसून आलेला नाही. महत्वाच्या उपांत्या सामन्यात त्याने सुरुवात जरी चांगली करुन दिला असली तरी त्याला अर्धशतकही ठोकता आले नाही.तर दुसरीकडे विराटने शानदार शतक ठोकून आपले एकदिवसीय सामन्यातील 50 वे शतक केले आहे.त्याच्याकडून देखील होणाऱ्या अंतिम सामन्यात मोठी खेळीची अपेक्षा आहे.शुभमन गिलनेही आपली छाप सोडली असून भारताला एक चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदरी त्याच्यावर असणार आहे.श्रेयस अय्यर गेल्या काही सामन्यापासून चांगलाच फाॅर्मात आहे.उपांत्य सामन्यात त्याने तूफानी फलंदाजी करत अनेकांचा मने जिंकली आहेत. मधल्या फळीत येणारा के.एल राहुलला अपली चमक दाखवण्याची उत्तम संधी आहे.एकंदरीत भारतीय संघ संतुलीत असला तरी ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूला आहले शंभर टक्के योगदान द्यावे लागणार आहे.तर दुरीकडे ऑस्ट्रेलिया संघही विश्वचषक उंचवण्याच्या दृष्टीने मैदानात उतरणार आहे.कर्णधार पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत आठ वेळा अंतिम फेरी गाठली आहे.ऑस्ट्रेलियाक संघात ही दमदार फलंदाज व गोलंदाजांचा भरणा आहे.डेव्हिड वॉर्नर,स्टीव्ह स्मिथ, डबल शतक ठोकणारा ग्लेन मॅक्सवेल,ट्रॅव्हिस हेड सारखे घातक फलंदाज आहेत.तर फिरकीपटू अॅडम झाम्पा,मार्कस स्टॉइनिस सारखे गोलंदाज आहेत.त्यामुळे भारताला अंतिम सामन्यात आपल्या सर्व आघाडींवर उत्कृष्ट कामगिरी करावी लागणार आहे. एक लाख ३२ हजार क्षमता असलेल्या या स्टेडियवर रविवारी हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळणार आहे.

दोन्ही संघाता विश्वचषक जिंकण्याचा इतिहास

भारतीय संघाचा विश्वचषकातील चौथा खिताबी सामना आहे. या संघाने 1983 मध्ये कपिल देवच्या नेतृत्वात पहिल्यांदा खिताब जिंकला होता. यानंर 2003 मध्ये भारताला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव सहन करावा लागला होता. मात्र 2011 मध्ये भारतीय संघाने दुसऱ्यांदा वर्ल्डकप पटकावला. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळला होता.तर आता ऑस्ट्रेलियाचा संघ 8 व्यांदा फायनलमध्ये खेळण्यास उतरणार आहे. त्यांनी आतापर्यंत 7 पैकी पाचवेळा खिताब जिंकला आहे. त्यांना दोन वेळा वेस्ट इंडिज आणि 1996 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पराभव सहन करावा लागला होता. तर ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 5 वेळा 1987 , 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये खिताब जिंकला होता.विशॆष म्हणजे हे दोन्ही संघ 20 वर्षांनी पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये आमनेसामने आले आहेत.

Latest Posts

Don't Miss