| TOR News Network |
Bjp Seat Sharing Latest news : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जागा वाटपातील मतभेद मिटवले आहेत.(Bjp Seat sharing in trouble) दिल्ली दरबारी काल झालेल्या बैठकीत तीनही पक्षांनी जागा वाटपावर खल पूर्ण केला. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील 288 विधानसभा जागांमधील 278 जागांवर (Maharashatra Vidhansabha Election 2024) उमेदवारी निश्चित केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तरीही 10 जागांवर अजून एकमत झालेले नाही. त्यावर पण लवकरच तोडगा काढण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत या 10 जागांचा पेच सोडवण्यात येईल असे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (Fadnavis on seat sharing)
दिल्ली येथे अमित शहा (Amit Shah) यांच्या नेतृत्वात महायुतीची बैठक झाली. यावेळी तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. ही बैठक सकारात्मक झाली. त्यात जवळपास 278 जागांवर एकमत झाले. तर 10 जागांवर आतापर्यंत निष्कर्ष निघाला नसल्याचे ते म्हणाले. या दहा जागांवर आता लवकरच मार्ग काढण्यात येणार आहे. 1-2 दिवसांत चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील (BJP-Shivsena-NCP) बैठकीत केवळ 10 जागांवर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. एक-दोन दिवसात त्यावर तोडगा निघेल. महायुती आता लवकरच सर्व जागांची घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महायुतीने जागा वाटपात आघाडी घेतली आहे. लोकसभेत जागा वाटपातील घोळ झाल्याचा मोठा फटका महायुतीला बसला होता. विधानसभेपूर्वी तीनही पक्षांनी याविषयी मोठी खबरदारी घेतली. आतापर्यंत भाजपने 99, शिवसेनेने 40 तर राष्ट्रवादी पक्षाने 38 जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे.