Monday, January 13, 2025

Latest Posts

ॲड. आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी निवड

| TOR News Network | Lawyer Ashish Deshmukh Latest News : नुकतेच मुंबई येथे बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदासाठीची निवडणूक पार पडली. यामध्ये विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे प्रख्यात विधिज्ञ ॲड.आशिष पंजाबराव देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. (Election of Bar council of India)

बार कौन्सिल ऑफ इंडिया ही विधिज्ञांची देशातील सर्वोच्च वैधानिकसंस्था आहे. या संस्थेवर भारतातील प्रत्येक राज्यामधून  एक प्रतिनिधी निवडल्या जातो. महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्याच्या संयुक्त बार कौन्सिल तर्फे एक प्रतिनिधी बार कौन्सिल ऑफ इंडियावर पाठविला जातो.

ॲड. आशिष  देशमुख यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदासाठी नामांकन अर्ज सादर केला होता. त्या अर्जास सूचक म्हणून पुणे येथील प्रख्यात विधिज्ञ ॲड. हर्षद निंबाळकर व अनुमोदक म्हणून ठाणे येथील प्रख्यात विधिज्ञ ॲड. गजानन चव्हाण यांनी स्वाक्षरी केली. केवळ एकच अर्ज आल्यामुळे निवडणूक अधिकारी  श्रीमंतो सेन व सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रविण रणपिसे यांनी त्यांची अविरोध निवड घोषित केली व त्याबाबतची अधिसूचना प्रसिध्द केली. (Adv Ashish Deshmukh selected Unopposed)

बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या इतिहासामध्ये तालुक्याच्या ठिकाणी कामकरणऱ्या वकिलाची ॲड. आशिष  देशमुख यांच्या रुपाने पहिल्यांदाच निवड झाली. तसेच विदर्भाला सुध्दा हा मान प्रथमच प्राप्त झाला आहे.(Vidarbha got this honor for the first time)

ॲड. आशिष  देशमुख यांच्या निवडीमुळे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील वकिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते महाराष्ट्र आणि गोवा राज्य बार असोसिएशनच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवत २०१९ साली सदस्य म्हणून निवडून आले हे विशेष. ते महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. (He is the former President of Maharashtra and Goa Bar Association) ॲड.आशिष  देशमुख यांच्या निवडीबद्दल पुसद बार असोसिएशनतर्फे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Latest Posts

Don't Miss