Saturday, January 18, 2025

Latest Posts

मनोज जरांगे यांच्यासाठी झेड + सुरक्षेची मागणी : संभाजीनगरात आंदोलन

| TOR News Network |

Jarange Patil Latest News : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी गावामध्ये ड्रोन फिरत आहेत.त्यामुळे अंतरवाली सराटीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी सभागृहात केली होती. (Wadettiwar demands Z+ for jarange Patil) दुसरीकडे आता मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा संघटनांनी मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरुक्षा देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगरात आंदोलन केले.(Protest At Sambhajinagar)

अंतरवली सराटी या गावावर ड्रोनने टेहळणी होत असल्याचे वृत्त आले आहे. त्यानंतर मराठा समाजात आणि राज्यातील राजकारणातून मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.(Jarange Patils Life in Danger) ड्रोनद्वारे टेहाळणीचे प्रकार कोण करत आहे, कशामुळे ही टेहळणी केली जात आहे? असे प्रश्न निर्माण झाले आहे. परंतु या प्रकारामुळे अंतरवाली सराटीमधील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका असल्यामुळे मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी मराठा संघटनेकडून करण्यात आली.(Maratha Samaj Demands Z+ for Jarange Patil) त्यासाठी मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या जिजाऊ चौकात मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करत काही काळ रास्तारोको देखील केला. आंदोलनात अनेक पदाधिकारी सहभागी झाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली.

Latest Posts

Don't Miss