Saturday, January 11, 2025

Latest Posts

काँग्रेस-शिवसेना वाद : विदर्भातील त्या जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडू नका

| TOR News Network |

Uddhav Thackeray Shivsena Vs Congress: आगामी विधनसभेसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन जोरदार घामसान सुरु आहे.(tought fight for seat sharing in sena congress) उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज म्हणजेच 21 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत जागावाटपावर तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त केला आहे. (sanjay raut on mahavikas aghadi list) मात्र या दोन्ही पक्षांमध्ये नेमका काय वाद आहे याची खरी माहिती समोर आली आहे.

(Seat Sharing dispute in shivsena-congress)

महाराष्ट्र काँग्रेसची रात्री उशीरा बैठक पार पाडली. बैठकीदरम्यान, शिवसेना ठाकरेंच्या पक्षाच्या भूमिकेवर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून जागावाटपात सहकार्य केलं जातं नसल्याचा राज्यातील नेत्यांचा सूर असून त्यांनी तशी माहिती वरिष्ठ नेत्यांना कळवली आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांची एकमुखाने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात आपलं काय म्हणणं आहे ते कळवलं आहे. “काहीही करा मात्र विदर्भातील त्या जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडू नका,” असं काँग्रेसच्या नेत्यांनी खरगेंना सांगितलं आहे.(congress worker to mallikarjun kharge)

लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसचं राज्यातील केडर सक्रियं झालं असून अनेक जागांवर काँग्रेस उमेदवार निवडून येऊ शकतो, असं राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे. याच कारणामुळे ठाकरेंशी जागांवरुन तडजोड करताना जागांबाबत झुकतं माप घेऊ नका असं राज्यातील नेत्यांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना कळवल्याचं वृत्त आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका ही सांगलीच्या जागेसारखीच आहे, त्यामुळे यावावर वरिष्ठांनी विचार करावा असं राज्यातील नेत्यांनी दिल्लीतील वरिष्ठांना कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नाना पटोले यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना, 40 जागांवरुन वाद सुरु असून तो लवकरात लवकर सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच विदर्भातील 12 जागांवरुन कोणताही वाद नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मात्र या 12 जागा त्या 40 जागांमध्येच आहेत, असं सूचक विधानाही त्यांनी केलं आहे. तसेच 22 ऑक्टोबरला मुंबईतून पक्षाची पहिली यादी जाहीर केली जाईल, असंही पटोले म्हणाले.

Latest Posts

Don't Miss