Saturday, January 11, 2025

Latest Posts

शरद पवारांना परत एक धक्का ? या दोन नेत्यांमध्ये बंद दारआड चर्चा

| TOR News Network | Ajit Pawar & Sharad Pawar Group Leaders Meeting : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे मोठे नेते यांच्यात पुण्यात बंद दाराआड चर्चा झाली आहे. ही भेट कशासाठी झाली? बैठकीत काय झाले ? ते कोणता निरोप घेऊन आले ? ते शरद पवारांची साथ सोडणार का ? असे अनेक प्रश्न राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील कार्यकर्त्यांना व नेत्यांना पडत आहेत.(Sharad Pawar group Leader Meets Ajit Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार सातत्याने चर्चेत आहेत. या बंडानंतर अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ही मिळाले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार असे पक्षाचे नाव घेतले. त्यांना तुतारी हे पक्ष चिन्ह मिळाले. त्याचे अनावरण आज झाला.(Tutari NCP Symbol Launched) त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात आज विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सात वाजल्यापासून पुण्यातील सर्कीट हाऊसमध्ये बैठका सुरु आहेत. त्याचवेळी शरद पवार गटाचे बडे नेते राजेश टोपे अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले. (Rajesh Tope Ajit Pawar Meeting at Circuit House in Pune) दोन्ही नेत्यांमध्ये बंद दारआड चर्चा झाली.(Rajesh Tope Meet Ajit Pawar)

चर्चेत अन्य कोणी उपस्थित नव्हते

अजित पवार आणि राजेश टोपे यांची बैठक सर्कीट हाऊसमध्ये बंद दाराआड झाली. या चर्चेच्या दरम्यान अन्य कोणी उपस्थित नव्हते. राजेश टोपे अजित पवार यांना भेटून सर्किट हाऊस मधून निघाले. त्यानंतर राजेश टोपे यांना माध्यमांनी गाठले. त्यावेळी त्यांनी चर्चेचा तपशील जाहीर करण्यास नकार दिला. (Tope Declined to release details) यामुळे या भेटीत काय खलबंत झाले त्याची माहिती नाही. दरम्यान राजेश टोपे यांनी भेटीबाबत स्पष्टीकरण केले आहे. मी अजित पवारांना भेटलो नाही. मी त्या सर्कीट हाऊसवर मुक्कामी होतो, असे त्यांनी म्हटले आहे.(I Did’nt Meet Ajit Pawar Says Tope)

कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार

अजित पवार दुपारनंतर बारामती लोकसभा मतदार संघातील, भोर, मुळशी आणि खडकवासला मतदार संघात ते कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार आहेत. तसेच काही पक्ष प्रवेश देखील होणार आहेत.

Latest Posts

Don't Miss