Sunday, January 12, 2025

Latest Posts

अरमान ला ऑल इंडिया टेनिस स्पर्धेत विजयी

Theonlinereporter.com – May 11, 2024 

Arman Patil Won All India Tennis Tournament : ऑल इंडिया टेनिस असोसिएशन द्वारा आयोजित १८ वर्षे मुले व मुली ऑल इंडिया टेनिस स्पर्धा दि. ६ ते १० मे २०२४ दरम्यान रायपूर येथे संपन्न होत आहे यात सिंसीअर टेनिस अकॅडमी चा खेळाडू अरमान पाटील (महाराष्ट्र) व ध्रुव हेगडे ( तेलंगणा) ह्या जोडीने दुहेरीत अंतिम फेरीत प्रवेश करुन विजेता ठरले . क्वॉटर फाइनल मधे खैमान (छ.ग.) व शौर्य बिराजदार (महा.) ला ७-५,६-० , सेमि मधे मनन मिश्रा (उ. प्र.) व निपुण चव्हाण ला ६-०, ६-१ ने पराभूत केले व अंतिम सामन्यात आर्नव चौधरी (महाराष्ट्र) व मोहमद खान (छ.ग.) यांना ६-०,७-५ ने पराभूत करुन विजय मिळवला. अरमान हा आंबेडकर कॉलेज च्या , व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर सचिन पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली नियमित सराव करतात.

निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ गजभिये सर, डॉ. माहुरे, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए.पी. जोशी , डॉ. गोलावर, डॉ. मुकेश वाघमारे , शैलेश सर, संजय भिवगडे, सोनल गोळे, विकास शर्मा, वैभव कुंभरे, प्रेम राखडे व चेतन उके व सर्व सिंसीआर टेनिस अकॅडमी च्या सदस्यांनी अभिनंदन केले व येणाऱ्या स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

Latest Posts

Don't Miss