| TOR News Network | Shirur Lok Sabha Election : यंदा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील काही जांगांच्या उमेदवारांची उत्सुक्ता अवघ्या राज्याला लागली आहे. त्या पैकी एक जागा आहे शिरुर लोकसभेची. शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरला असून यात विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे निश्चित मानले जात आहे. (Who will contest shirur against amol kolhe) तर महायुतीकडून कोण या बाबत मात्र अनेकांचे दावे समोर येत आहे. अशात अजित पवार गटाकडून एका तगड्या नेत्याचे नाव जवळपास पक्के झाल्याची माहिती समोर आली आहे.(Mahayuti candidate for shirur lok sabha)
अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. (Shivaji adhalrao patil from shirur) निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढळराव पाटील यांना दिले आहेत.आज बुधवारी (ता. २०) अजित पवार (Ajit Pawar) शिरुर लोकसभा मतदारसंघात दौरा करणार आहेत. शिवाजीराव आढळराव पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाला होणारा विरोध टाळण्यासाठी ते कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहे. त्याचबरोबर ते दिलीप मोहिते पाटील यांची देखील मनधरणी करणार आहेत. (Breaking Marathi News)
राष्ट्रवादीत प्रवेश देऊन उमेदवार देणार
शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हेंचा पराभव करणार, असं अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे म्हटलं होत.(We will win shirur seat says ajit pawar) मात्र, कोल्हेंविरोधात नेमकं निवडणुकीच्या रिंगणात कुणाला उतरवायचं असा प्रश्न अजित पवारांसमोर होता.अशातच शिंदे गटाच्या शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन निवडणुकीच्या उमेदवारी देण्याचं अजित पवारांनी ठरवलं.(adhalrao patil to join ajit pawar ncp) मात्र, आढळराव पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जाहीरपणे विरोध दर्शवला.
मोहिते पाटील यांची मनधरणी करणार
आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील २० वर्षाचा संघर्ष असल्याने त्यांचे काम करण्यापेक्षा मी राजकारण सोडून घरी बसेल, अशी ठाम भूमिका दिलीप मोहिते पाटील यांनी घेतली. (dilip mohite patil for shirur) आता मोहिते पाटील यांची मनधरणी करण्यासाठी अजित पवार शिरुरमध्ये जाणार आहेत.त्याचबरोबर आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत ते कार्यकर्त्यांसोबत संवाद देखील साधणार आहे. यानंतर एक ते दोन दिवसांत शिरुर लोकसभेतून आढळराव पाटील हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असणार, अशी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.