Saturday, November 16, 2024

Latest Posts

मनसेला भाजपने मते खाण्याची सुपारी दिली – रोहित पवार

| TOR News Network |

Rohit Pawar Latest News : राज ठाकरे यांच्या मनसने राज्यात सर्वच मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. नंतर त्यांनी अनेकांचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माघार घ्यायला लावली. या घडामोडी बघता मनसेला भाजपने मते खाण्याची सुपारी दिली असावी अशी शंका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली. (Rohit Pawar on Raj Thackeray)

राज ठाकरे यांचे कोणाला काही समजत नाही. ते वेळोवेळी भूमिका बदलतात. त्यामुळे राज ठाकरे यांची उंची कमी होत चालली आहे. भाजपच ती कमी करीत आहे. त्यामुळे दुदैवाने आम्हाला त्यांच्याबाबत बोलावे लागत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत मतांचे विभाजन करून त्यांना भाजपला मतद करायची आहे असे त्यांच्या धोरणावरून दिसते. दुर्दैवाने राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हणावे लागते. शरद पवार यांच्यावरही ते टीका करीत आहेत. मात्र त्यांना मला एवढेच सांगायचे आहे, शरद पवार यांनी कधीही कुटुंब आणि पक्ष फोडला नाही. या उलट हे काम देवेंद्र फडणीस यांनी केले. (Rohit Pawar on fadnavis) राज ठाकरे यांनी स्वतंत्र पक्ष काढला. ही चांगली गोष्ट आहे. त्यांची पूर्वीची आणि आत्ताची भाषण ऐकली तर ते इतक्या पटापट भूमिका बदलत असल्याचे दिसून येते. त्यामुळे लोकांना काही कळेनासे झाले आहे, ते नेमके कोणाच्या बाजूने आहेत. (rohit pawar slams raj thackeray)

अजिद दादा यांना पवार साहेबांनी सर्व काही दिले होते. (rohit pawar on ajit pawar) त्यानंतरही ते भाजपच्या नादी लागले. कुटुंब सोडले. आत सहानुभूतीसाठी ते वेगवेगळे वक्तव्य करीत आहे. मात्र त्याला काही अर्थ नाही. मात्र ते लोकांची दिशाभूल करीत आहे एवढे नक्की असेही रोहित पवार म्हणाले.

शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरल्याशिवाय मतदान मिळत नाही. महाराष्ट्रातील सामान्य व्यक्ती हेच बोलत होता. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा अजित दादांना नाव व फोटो वापरण्यास मनाई केली आहे. अजित पवार यांनी बाहेर पडण्यापूर्वीच याचा विचार करायला पाहिजे होता. पैसा असेल तेव्हा पक्ष फोडायला अक्कल लागत नाही. मात्र पक्षा बांधयाला, वाढवायाला आणि माणसे जपायला अकक्ल लागते असे सांगून नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

दिलीप वळसे पाटील यांना पवार साहेबांचा मानसपुत्र  समजायचे. त्यांना खूप संधी दिली, पदे दिली. मात्र कारवाईच्या भीतीने ते भाजपबरोबर गेले. (Rohit Pawar on dilip wales patil) गेले तर गेले त्यांच्या मित्राच्या कंपनीला सरकारतर्फे मोठे टेंडर देण्यात आले. शंभर दोनशे कोटींचा मलिदा देण्यात आला. ते म्हणतात विकासासाठी गेले  यावररून ते कोणाच्या विकासासाठी गेले सिद्ध होते असेही रोहित पवार म्हणाले.

Latest Posts

Don't Miss