Sunday, November 17, 2024

Latest Posts

विधान परिषदेच्या जागेसाठी आज निकाल : कोण मारणार बाजी

| TOR News Network |

Vidhan Parishad Latest News : विधान परिषदेच्या चार जागांचा निकाल आज जाहिर होणार आहे. समोर येणार आहे. विधान परिषदेच्या (Legislative Council Election) मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांचा निकाल आज समोर येणार आहे. नवी मुंबईतील कोकण भवन येथे मुंबई, कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी होईल.(Vote counting for vidhan parishad)

कोकण पदवीधर मतदार संघाच्या (Konkan Graduate Constituency) निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया सकाळीपासून सुरू झाली आहे व संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.(Vidhan Parishad Result) मतमोजणीच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या मतदार संघात विविध पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मतमोजणीच्या प्रक्रियेचा वेग आणि निकाल हा सर्वांसाठी उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. मतमोजणीच्या निकालानंतर कोकण पदवीधर मतदार संघाचा नवा प्रतिनिधी कोण असेल, हे स्पष्ट होईल. मतमोजणीच्या ठिकाणी सुरक्षेसाठी आणि शांततेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणूक बिनविरोध ‌करण्यासाठी महाविकास आघाडी आग्रही. महाविकास आघाडीकडे 72 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.(Mahavikas Aghadi claim 72 mla support)

शिक्षक मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला विजय निश्चित असल्याचे सांगितले.(Ubt jagannath Abhyankar claim to win) निवडणुकीच्या वेळी जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. मतदारांमध्ये उत्साह होता. निवडणूक जिंकल्यानंतर जुनी पेन्शन योजनेसह अनेक कामे करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.मुंबई पदवीधरमध्ये उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात सामना आहे. दुसरीकडे कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश किर यांच्यात लढत आहे.

Latest Posts

Don't Miss