Saturday, January 18, 2025

Latest Posts

संविधान बदलण्यावर फडणवीसांचे स्पष्ट मत,म्हणालेत…

| TOR News Network | Fadnavis On Constitution Change:  भाजपने काल जाहीर झालेल्या जाहीरनाम्याला संकल्प पत्र म्हटले आहे.(Bjp manifesto Released) त्या विषयी आज भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली व त्यातले बारकावे समजून सांगितले.(Fadnavis on bjp menifesto) “भाजपाचा जाहीरनामा ही मोदींची गॅरेंटी आहे. “काँग्रेसचा जाहीरनामा हा अपयशी आहे.(Congress manifesto is a failure) काँग्रेसने छत्तीसगड, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये विजय मिळवला होता. पण जाहीरनाम्यातील एकही गोष्ट पूर्ण केली नाही. आता कर्नाटकात निवडून आले, तरी जाहीरनाम्यातील एकही गोष्ट पूर्ण केलेली नाही.

म्हणून चहा विकणाऱ्याचा मुलगा देशाचा पंतप्रधान

काँग्रेससासठी जाहीरनामा एक कागद आहे. आमच्यासाठी मोदींची गॅरेंटी आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (For us Manifesto is Modi’s guarantee)“मल्लिकार्जुन खरगे यांनी देशाच सोडून द्यावं, ते कर्नाटकातून येतात. काँग्रेस अध्यक्ष आहेत. कर्नाटकात तुम्ही दिलेली आश्वासन पूर्ण करु शकला नाहीत. आश्वासन पूर्ण करण्यासाठी नसतात, असं तुमची लोक म्हणतात” अशा शब्दात फडणवीसांनी खरगेंवर निशाणा साधला.(Fadnavis targeted Kharge) संविधान बदलण्याच्या मुद्दावर देखील फडणवीस यांनी भाष्य केलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच संविधान होतं, म्हणून चहा विकणाऱ्याचा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला. एनडीएचा प्रमुख म्हणून मोदींची निवड झाली, त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम संविधानाची पूजा केली. त्यानंतर पद स्वीकारलं. कुठल्याही ग्रंथापेक्षा संविधान महत्त्वाच असल्याच त्यांनी म्हटलं. मागची दहावर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यांनी संविधानाच रक्षण केलं.(Modi protected the constitution) संविधान बदलण्याचा विचार केला नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (No Change in constitution)

हा काँग्रेसचा जुमला आहे

“सगळ्यात महत्त्वाच म्हणजे, सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलय की, संविधानाच बेसिक स्ट्रक्चर बदलण्याचा अधिकार संसदेला नाही. हा काँग्रेसचा जुमला आहे.(Bjp will change constitution is the jumla of Congress) ज्यावेळी विकासाचा विचार मांडता येत नाही. ज्यावेळी कुठलही जनहिताच कार्य करता येत नाही. विश्वासहर्ता संपलेली असते. अशावेळी लोकांच्या मनात कनफ्युजन निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. (Congress confusing voters) 2014, 2019 आणि आता 2024 मध्येही काँग्रेसचा तोच प्रयत्न आहे. पण लोकांचा विश्वास मोदींवर आहे. (people belive modi) तीन राज्यात मोदींच्या बाजून कौल दिला. आता सुद्धा जनता मोदींच्या बाजूने मतदान करेल” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Latest Posts

Don't Miss