अमन पठाण मिस्टर तर खुशी पटले मिस एनआयटी
| TOR News Network | Nit College Pratibimb 2024 : एनआयटी महाविद्यालयात सुरु असलेल्या प्रतिबिंब २०२४ च्या दुसऱ्या दिवशी अनेक मनोरंजक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र बॉलीवुड या थीम असलेल्या फॅशनशोने धमाल केली.(Fashion Show In Nit college) स्नेहसंमेलनाची सुरुवात महिला शिक्षकांच्या नृत्याने झाली. त्यानंतर विविध नाटके सादर करण्यात आली.तसेच डॉग शोचे देखील त्यात आयोजन करण्यात आले होते.तर गायनाच्या जुगल बंदीने रसीकांना मोहुन टाकले.
कार्यक्रमात झालेल्या रॅम्प वॉक प्रेझेंटेशनने साऱ्या रसीकांना मोहुन टाकले. व त्या तालावर सर्व प्रेक्षकांना तल्लीन करुन तो क्षण अविस्मरणीय ठरवला. या शोने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना एक नवीन वळण दिले व नव्या क्षेत्राचे दालन उघडे करुन दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांच्या प्रतिभेचे दर्शन करुन दिले. फॅशनशो मध्ये मिस्टर एनआयटी अमन पठाण आणि मिस एनआयटी खुशी पटलेने पुरस्कार बहाल करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन प्रा. आशिष उमरकर यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला व मनसोक्त संगीताच्या तालावर त्यांचेपाय थीरकले.(College Student Enjoy Pratibimb 2024)
संघर्ष करा आणि जीवनात यश मिळवा – डॉ. मनोज डायगव्हाने
कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात जशी उल्हासात होते तशी त्याची सांगता देखील तितक्याच जोशात होणे गरजेचे असते. प्रतिबिंबच्या शेवटच्या दिवशी एनआयटी तंत्रनिकेतन मध्ये घालवलेल्या मनमोहक आठवणींना उजाळ देण्यासाठी माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात येतो.(Pratibimb 2024 Nagpur) हा एक कधी न संपणाऱ्या व हव्याहव्याशा वाटणाऱ्या आठवणींना उजाळा देणारा क्षण ठरला. जुन्या मित्रांशी पुन्हा घातलेली ही भेट चांगल्या वाईट काळाची उजळण करुन देते. तसेच नवीन पिढीसोबत संवाद साधून भविष्यातील वाटचालीसाठी त्याचे अनुभवाचे देखील आदान प्रदान केले जाते. सांगता समारोहाला प्रमुख पाहुणे म्हणून बुटीबोरी मॅन्यूफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर होते.(BMA President Nitin Lonkar at Nit College) यावेळी रवी सिंग, प्रा. गजानन पोटभरे, प्रा. नागेश इजमुलवार कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. समीश फाले व प्रा. शारदा चौधरी प्रामुख्याने उपस्थीत होते. नितीन लोणकर यांनी आपल्या भाषणात आज शिक्षण घेतानाच उद्योगाचे शिक्षण घेणे किती गरजेचे आहे याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.तसेच विद्यार्थ्याच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. ज्यात विविध क्रिडा फेट स्पर्धा ऑर्ट ॲन्ड गॅलरी अंतर्गत विविध क्षेत्रात उंच भरारी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.विविध विभागातील विद्यार्थ्यांना प्रथम प्राविण्या प्राप्त विद्यार्थ्यांना मानचीन्ह देउन गौरवविण्यात आले. तसेच महाविद्यालयातील उत्कृष्ट शिक्षक हा पुरस्कार प्रा. राजकुमार वाडबुदे व उत्कृष्ट शिक्षकेत्तर पुरस्कार झबीउल्ला खान यांना देण्यात आला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.