Thursday, January 16, 2025

Latest Posts

नागपुरसह राज्यातील अनेक पेट्रोल पंप झाले ड्राय

दुसऱ्या दिवशीही पंपासमोर लांब रांगा कायम

Petrol Pump Dry News Nagpur : नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून शहरात पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. केंद्र सरकारने लोकसभेमध्ये संमत केलेल्या हिट आॅड रन हा कायदा रद्द अथवा त्यात दुरुस्ती करण्याची मागणी ट्रक चांलकांची आहे. ट्रक चालकांनी कायद्यातील जाचक अटीविरुद्ध संप पुकारला आहे. त्याचवेळी इंधन कंपन्यांना पुरवठा करणाऱ्या टॅंकर चालकही तीन दिवसाच्या संपावर गेले आहेत. परिणामी  नागपुर, अहमदनगर,जालनासह राज्यातील अनेक पेट्रोल पंप ड्राय झाले आहेत. (Petrol Pump Getting dry in nagpur due to truck driver strike)

शहरात पेट्रोल- डिझेलचा तुटवडा जाणवण्याचे अफवा पसरल्याने अनेकांनी पेट्रोल भरण्यासाठी एकच गर्दी केल्याने लांबच लांब रांगा लागल्या आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात शहरातील अनेक पेट्रोल पंप ड्राय होण्याची शक्यता वर्तवली जात होती ती आता खरी ठरताना दिसत आहे.छत्रपतिनगर येथील पेट्रोल पंपावर डिझेल संपले आहे.त्यामुळे नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.तर काही ठिकाणी पेट्रोल संपल्याच्या बातम्या पुढे येत आहे.अशात अनेक पंप झपाट्याने ड्राय होत आहेत.

ट्रान्सपोर्ट चालकांचा संप असल्यामुळे तीन दिवस पेट्रोल मिळणार नसल्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवर लांबलचक रांगा लागल्या होत्या. टँकर चालकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात पेट्रोल-डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंदोलनात बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडिया ऑइल या तिन्ही सरकारी तेल कंपन्यांच्या टँकर चालकांचा समावेश आहे.

राज्याच्या विविध भागात टँकर बाहेर न पडल्याने इंधनाचा पुरवठा विस्कळित झाला. टँकर चालकांचा संप लवकर मिटला नाही तर राज्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा होण्यास अडचणी येऊ शकतात. लांबच लांब रांगा असल्यामुळे पेट्रोल पंप झपाट्याने ड्राय होत आहेत.तर नागरिक आता शहरा बाहेर असलेल्या पेट्रोल पंपाकडे धाव घेत आहेत.

Latest Posts

Don't Miss