Sunday, January 12, 2025

Latest Posts

युगेंद्र पवार बारामतीचे नवे ‘दादा’ ? ताई म्हणाल्यात बघूया पुढे काय होतं

| TOR News Network |

Supriya Sule Latest News : लोकसभा निवडणुकीच्या काळात अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी मतदारसंघाचा दौरा केला. त्यानंतरही ते मतदारसंघात अॅक्टिव्ह पहायला मिळालेत.शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत.(Sharad Pawar On Drought tour)

त्यामुळे आमागी विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांना बारामतीतून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे.यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे.(Supriya sule on yugendra pawar) युवेंद्र पवार बारामतीचे नवे ‘दादा’ आहेत का? (yugendra Pawar new dada of Baramati) असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं.

युवेंद्र पवार ती चार वर्षापासून बारामतीत फिरतोय. विद्या प्रतिष्ठानमध्ये चांगलं काम आहे. स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवतोय. लोकांची काम करतोय. आघाडी नेते काय ते निर्णय घेतील. तो फिरतोय म्हणून त्याला उमेदवार दिली जाईल किंवा नाही, याची चर्चा फार लवकर होत आहे असं मला वाटतं. बघूया पुढे काय होतं ते, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. बारामती आणि परिसरातील शेतकरी मेळाव्यांना ते हजेरी लावत आहेत.(Sharad Pawar On Farmer public meeting) यावर चांगल्या मार्काने पास होण्यासाठी प्रयत्न करत असतात. महाविकास आघाडी म्हणून अनेक मुद्द्यांवर आम्ही काम करत आहोत. अनेक चांगले निर्णय घेतले पण गेल्या दोन अडीच वर्षात यांचा सरकार आल्यापासून कोणते चांगले निर्णय घेतले राज्यात, देशात?, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात वाद असल्याची चर्चा होते. यावर हे सगळं मीडिया क्रिएटेड आहे.(Supriya Sule on rohit pawar) समज गैरसमजातून होणाऱ्या बातम्या आहेत. याच्यावर कोणीही जबाबदार व्यक्तींनी भाष्य करू नये. शब्दाला शब्द वापरला जातो आणि चुकीची माहिती अनेक वेळा उत्सुकतेभरात बाहेर येत असते. आता एकच लक्ष आहे विधानसभा… गांभीर्याने निवडणूक घेतली पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणल्या.(Supriya sule on vidhan sabha)

Latest Posts

Don't Miss