Thursday, January 16, 2025

Latest Posts

तुमचा दादा काम करणारा आहे : राजकारणात आल्यापासून मी….

| TOR News Network |

Ajit Pawar Latest News : राज्यातील प्रत्येक महिला सक्षम व्हावी. स्वत:च्या पायावर उभी राहावी. आपण कोणावर अवलंबून आहोत असं वाटू नये, यासाठी लाडक बहीण योजना राबवण्यात आल्याचं पवार म्हणाले.(Ajit Pawar On ladki bahin yojana) ते पुढे म्हणाले, राज्यातील माता भगिनींनी स्वत:च्या पायावर उभं राहावं यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. महिला उद्योजकांना साहाय्य केलं जात आहे. शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या महिलांना मोफत शिक्षण दिलं जात आहे. मात्र विरोधकांकडून बजेटला नावं ठेवली जात आहे.(Ajit Pawar On opposition) तुमचा दादा काम करणारा आहे. असे आज अजित पवारांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करत म्हणटंले आहे.(Ajit Pawar On X Video)

राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदलला नाही. (Ajit Pawar On Party Change) जनता हाच माझा पक्ष. राज्यातील जनतेच्या विकासाच्या चाकाला अधिक गती कशी देता येईल हाच विचार माझ्या डोक्यात सुरू असतो. म्हणून शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या. 44 लाख शेतकऱ्यांचं वीजबिल माफ केलं.(Ajit Pawar On Farmer Power Supply) हे विरोधकांना सहन होत नाही. अर्थसंकल्प ग्रामीण भागावर विशेष लक्ष देणारा आहे. राज्याच्या विकासासाठी यांचं काही देणंघेणं नाही. गावगाडा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मोठा निधी दिला. अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी वर्गासाठी योजना जाहीर केल्या मदत जाहीर केली पण विरोधक शेतकरी वर्गाला काहीच नाही असं म्हणत बोंबाबोंब करतात. अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधक झोपले होते का, असं म्हणज अजित पवारांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.(Ajit Pawar Slams opposition on budget)

राज्यसरकारने काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील 21 ते 60 वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. याशिवाय वारकरी, शेतकरी यांच्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. दरम्यान या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी आज अजित पवारांनी आपल्या  X हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना आवाहन केलं आहे. (Ajit Pawar Appeal to Janta)

Latest Posts

Don't Miss