Saturday, November 16, 2024

Latest Posts

भाजपला किती जागा मिळणार त्यावर काय म्हणाले निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव

| TOR News Network |

Yogendra Yadav Latest News : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता फक्त काही दिवस उरले आहेत. येत्या 4 जूनला निकाल जाहीर होतील. पण त्याआधी कोण जिंकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Which Party will win loksabha 2024) देशात सध्या इंडिया आघाडी आणि भाजपात थेट लढत आहे.अशात प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणूक 2024 बद्दल नुकताच एक अंदाज वर्तवला होता.त्यानंतर आता  योगेंद्र यादव यांनी देखील आपले भाकीत वर्तवले आहे. (yogendra yadav prediction on Bjp)

प्रसिध्द निवडणूक विश्लेषक प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी भाजपच्या जागांबद्दल भाकीत केले होते.(Prashnat kishor prediction)त्यानंतर आता आता योगेंद्र यादव यांनी सुद्धा भाकीत वर्तवलय आहे,योगेंद्र यादव सुद्धा म्हणतात भाजपा तिसऱ्यांदा सरकार बनवेल पण भाजपा किती जागा जिंकणार? (Yogendra Yadav Say Bjp will perform govt in india) या बद्दल त्यांचा अंदाज वेगळा आहे. भाजपाला सलग तिसऱ्यांदा सरकार बनवताना NDA मधील घटक पक्षांची गरज लागेल असं योगेंद्र यादव यांचं म्हणणं आहे.

भाजपाला लोकसभा निवडणुकीत 240 ते 260 जागा मिळतील, (Bjp will win 260 seats) असा योगेंद्र यादव यांचा अंदाज आहे. एनडीएमधील घटक पक्षांच 35 ते 45 जागांच योगदान असेल. त्यामुळे ते 275-305 पर्यंत पोहोचतील. योगेंद्र यादव यांच्यामते काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत 85 ते 100 जागा मिळतील. इंडिया आघाडीतील घटक पक्षांना 120 ते 135 जागा मिळतील. अशा रितीने विरोधी पक्षांची आघाडी 205 ते 235 (India alliance will reach till 235 seats) जागांपर्यंत पोहोचेल असं योगेंद्र यादव यांचं भाकीत आहेत.

एका मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी भाजपाला जवळपास 300 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारविरोधात लोकांच्या मनात फार राग नाहीय असं प्रशांत किशोर यांचं मत आहे. स्वबळावर भाजपाला 370 पर्यंत पोहोचण अशक्य असल्याचा त्यांचा अंदाज आहे. (Prashant kishor on bjp seats number)

Latest Posts

Don't Miss