Thursday, January 16, 2025

Latest Posts

यवतमाळात रोहित पवारांची शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासोबत दिवाळी

Rohit Pawar Yavatmal News 2023: यवतमाळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज आर्णी तालुक्यातील वरूड  या आदिवासीबहूल गावाला मंगळवारी (ता. 13) भेट दिली. त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. (MLA Rohit Pawar celebrates Diwali in Yavatmal With Farmer Sucide Family)

भाऊबीजेला भेट म्हणून शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्याचे वचन दिले. यावेळी त्यांच्यासोबत वडील राजेंद्र पवार, आई सुनंदा, बहीण सई, पत्नी कुंती, उपस्थित होते. वरूड (तुका) येथील एका शेतकरी कुटुंबप्रमुखाचे चार वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले. आमदार पवार यांनी आज त्या कुटुंबाची भेट घेतली. त्या शेतकर्‍याची पत्नी सुलोचना नेवारे यांच्याशी संवाद साधला. खाटीवर बसून चहा व नाश्ता केला. कुटुंबाच्या व्यथा जाणून घेतल्या. मी तुमाला काय मदत करू शकतो, अशी विचारणा केली. आमदार पवारांचे शब्द ऐकून त्या महिलेच्या डोळ्यांतून अश्रू आले. वरूड (तुका) येथील ग्रामहीत या संस्थेच्या वतीने भाऊबीज कार्यक्रम घेण्यात आला. त्यात जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील 168 महिला उपस्थित होत्या. आमदार रोहित पवार यांनी एकल महिलांशी संवाद साधला. त्या महिलांनी आमदार पवारांना ओवाळणी घातली. पवार कुटुंबाकडून एकल महिलांना दिवाळीनिमित्त साडी-चोळी, स्कूल बॅग, फराळ भेट देण्यात आला. आमदार पवार यांनी स्वाभिमानी महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या व्हायला नकोत, असे मत व्यक्त केले. सरकारकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबांकरिता व विधवा महिलांकरीता राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

Latest Posts

Don't Miss