Sunday, January 12, 2025

Latest Posts

यवतमाळ हादरलं : पतीने केली पत्नीसह चौघांची हत्या

कळंब तालुक्यातील मंगळवारी रात्री ११ वाजताची घटना

Yavatmal Murder News Latest : नात्यात एकदा संशयाचा किडा घुसला की मग संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. अशाच संशयातून एका इसमाने त्याच्या पत्नीसह सासरा आणि मेव्हण्यांची निर्घृणपणे हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. (Yavatmal News Man Killed Wife, Father In Law And 2 Brother In Laws Due To Suspision On Wifes Character)

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका नराधम पतीने सासरवाडीत पत्नीसह जाऊन चौघांची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. आरोपीने त्याची पत्नी, सासरा आणि त्याच्या दोन मेव्हण्यांची निर्घृणपणे हत्या केली. जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा गावात ही दुर्दैवी घटना घडली.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने दारूड्या पतीने मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास पत्नीसोबत भांडण केले. या दोघांमध्ये नेहमीच वाद व्हायचा, अशी माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री पती-पत्नीमध्ये वाद झाला. तेव्हा संतापलेल्या जावायाने सबलीच्या सहाय्याने पत्नी रेखा, सासरा पंडित, सासू रूखमा व मेव्हणे ज्ञानेश्वर आणि सुनील यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. सबलीचा वार थेट छातीवर करण्यात आल्याने या घटनेत आरोपीची पत्नी रेखा पवार, सासरा पंडित भोसले, मेव्हणा ज्ञानेश्वर भोसले व सुनील भोसले हे जागीच ठार झाले. सासू रूखमा भोसले ही गंभीर जखमी झाली असून तिला उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याने आजूबाजूच्या परिसरात अक्षरश: दहशतीचं वातावरण आहे. आरोपी जावई विरचंद पवार याला कळंब पोलीसांनी बेड्या ठोकत अटक केली.

घटनेतील मृतकांची नावे

  • पंडित भोसले
  • सुनील पंडित भोसले
  • ज्ञानेश्वर पंडित भोसले
  • रेखा गोविंदा पवार
  • जखमी : रुखमा पंडित भोसले

Latest Posts

Don't Miss