Sunday, January 12, 2025

Latest Posts

आता एक्सचे (X) भन्नाट : फिचर व्हॉट्सॲपला बसू शकतो फटका

WhatsApp vs X : एलॉन मस्क यांनी ट्विटर हाती घेतल्यापासून ते एक प्रयोगशाळाच ठरले आहे. त्याचे नाव बदलण्यात आले. या मायक्रो ब्लॉगिंग साईटचे नाव X ठेवण्यात आले. या सोशल मीडिया ॲपने मध्यंतरी केलेल्या प्रयोगाचा मोठा फटका बसला. युझर्स परत मिळवण्यासाठी त्यांना आता आणखी नवीन प्रयोगाचा घाट घातला आहे. त्याचा व्हॉट्सॲपला फटका बसू शकतो.(X launched new features)

एलॉन मस्क याने ट्विटर हाती घेतल्यापासून या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचा खेळ झाला. त्याचे नाव एक्स, X करण्यात आले. पण सुविधा देण्याचा नावाखाली शुल्क अकारणी सुरु झाल्यावर युझर्सने या चिमणीला रामराम ठोकला. अजूनही सब्सक्रिप्शन प्लॅनची चलती आहे. चिमणीला उडवल्यानंतर मस्कने लोगो आणि नाव बदलले. त्याचा परिणाम झाला नाही. पण युझर्सची संख्या वाढवण्यासाठी मस्कने आता एक खेळी खेळली आहे. युझर्स परत आणण्यासाठी आता एक्सवर एकदम खास फीचर जोडण्यात आले आहे. त्याचा फटका व्हॉट्सॲपला बसू शकतो.

जोडले हे फीचर

तशी अनेकांना शंका पण आहे, कारण व्हॉट्सॲप हे पूर्णपणे मोफत आहे. त्यासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागत नाही. तर एक्सवर अनेक सेवांसाठी ग्राहकांना किंमत मोजावी लागते. बेसिक एक्सवर त्यांना फार सवलती मिळत नाही. आता एक्सवर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. अँड्रॉईड युझर्स त्यांच्या ॲपवरुन त्यांचे नातेवाईक, मित्र, संबंधितांना थेट कॉल करु शकतात. हा कॉल ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरुपाचा असेल.

Latest Posts

Don't Miss