Saturday, January 18, 2025

Latest Posts

अशी आहे भारतातील पहिली इथेनॉलवर धावणारी कार

Indias First Toyota Ethanol Car News : देशात पेट्रोल-डिझेलला पर्याय देण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार खास प्रयत्न करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतात १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार दाखल केली आहे. ‘टोयोटो इनोव्हा हायक्रॉस’ असं या गाडीचं नाव आहे. आता देशातील रस्त्यावर पहिल्यांदाच शंभरी टक्के इथेनॉलवर कार (Ethanol powered toyota car) धावतेय. वाढत्या इंधनाच्या दरामुळे लोकांच्या खिशावरही मोठा ताण पडत आहे. यामुळेच, पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणूनच इथेनॉल कार देशात लाँच करण्यात आली आहे. (Toyota Launched Indias first Ethanol Car)

देशात सध्या ई-२० लागू आहे, म्हणजेच २० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के पेट्रोल. इथेनॉलच्या वापरातून गाडी चालविण्याचा हा पहिला व्यावहारिक प्रयोग क्रांतिकारी म्हणावा लागेल. नितीन गडकरी यांनी येत्या काही महिन्यांत देशात शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या धावतील, अशी घोषणा अलीकडेच केली.(100 percentage ethanol car) यासाठी विविध कंपन्यांशी बोलणे सुरू असून लवकरच काही तांत्रिक बदल करून पूर्णपणे इथेनॉलवर धावणाऱ्या गाड्यांचे युग अवतरेल, असे त्यांनी म्हटले आहे. या घोषणेची बरीच चर्चा होत आहे. लहान-सहान गाड्यांसाठी कोणत्याही अन्य मिश्रणाशिवाय थेटपणे वापरण्यात येणारे इथेनॉल हे पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांमधील इंधनासाठी खात्रीशीर पर्याय म्हणून पाहिले जात आहे.ही जगातील पहिलीच इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल कार आहे.

येवढा असेल प्रति लिटरचे मायलेज

इथेनॉल पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अधिक स्वस्त आहे. आजघडीला एक लिटर इथेनॉलची किंमत सरासरी ६६ रुपयाच्या जवळपास आहे; तर पेट्रोलचा दर १०८ रुपये आहे. साहजिकच किमती थोड्याफार प्रमाणात कमी-जास्त झाल्या तरी इथेनॉलवरील गाड्यांमुळे चालकाला प्रतिलिटर ४० रुपयांचा थेट फायदा होणार आहे. ही बाब लोकांना आकर्षित करणारी ठरत आहे. कालांतराने अधिकाधिक नागरिक याच पर्यायाची निवड करतील.मायलेजचा विचार करता, इथेनॉलवर २२ ते २५ किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज मिळते. तज्ज्ञांच्या मते, इथेनॉलवरच्या गाड्यांचे मायलेज चांगले राहील आणि ते पूर्णपणे स्वदेशी असण्याची बाब निर्मात्यांसाठी वेगळाच अनुभव देणारी राहू शकते. इथेनॉलमध्ये अतिशय नगण्य प्रमाणात पाणी असते. त्यामुळे ते कोणतेही नुकसान करत नाही. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये पाणी मिसळण्याची शक्यता नाहीशी करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

इथेनॉलमुळे कोणाला फायदा?

इथेनॉलमुळे महागड्या पेट्रोल-डिझेलपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. वायू प्रदूषणापासून सुटका होईल. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही कार फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय यामुळे देशातील शेतकऱ्यांना उसाला चांगला भाव मिळण्यास मदत होणार आहे. इथेनॉलकडे पर्यायी इंधन म्हणून पाहिले जात आहे. इथेनॉलचा वापर केल्यामुळे देशाला होणारा फायदा स्पष्ट आहे. पेट्रोलमध्ये ते मिसळल्यामुळे खनिज तेल आयातीसाठी भारताचं इतर देशांवरचं अवलंबित्व कमी होईल. तसंच खर्चातही कपात होईल. सरकार इथेनॉलच्या निर्मितीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. इथेनॉलसाठी पिकांची लागवड केल्याने गेल्या आठ वर्षांत शेतकऱ्यांची ४० हजार ६०० कोटी रुपयांची कमाई झाली आहे. ऊस उत्पादकांना याचा मोठा फायदा होतो आहे. याखेरीज साखर कारखान्यांनाही यामुळे संजीवनी मिळणार आहे. एकूणच कृषी उद्योगाला प्रोत्साहन मिळेल आणि त्याच्या विस्तारातून रोजगार वाढेल.

Latest Posts

Don't Miss