Friday, January 17, 2025

Latest Posts

आमदार अपात्र प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात फैसला ?

| TOR News Network |

MLA Disqualification case : पक्ष सोडून जाणाऱ्या आमदारांना अपात्र करण्यात यावे, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. (Mla Disqualification case Petition) पण न्यायालयाने हा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला. त्यानंतर पण नार्वेकरांनी कोणत्याही गटातील आमदारांना अपात्र घोषित न करता सर्व पक्षांतील आमदार पात्र असल्याचा निर्णय दिला होता.(Narvekar Qualified All Mla) त्यानंतर  शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज पुन्हा सुनावणी पार पडणार आहे,(TOday Hearing on Mla Disqualification) त्यामुळे  न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्यातील बहुचर्चित शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी आज (23 जुलै) सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे.  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात दोन्ही पक्षांनी दाखल केलेल्या यांचिकांवर आज सुनावणी होईल. त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीकडे दोन्ही गटाचे आणि त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.(All Eye On Supreme Court Hearing)

राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला बहुमत मिळाल्याने खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल दिला. पण बंडखोरी करून  एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना  अपात्र घोषित  न केल्याने ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. (Sunil Prabhu appeal to supreme court) तर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलं नाही, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटाचे आमदार जयंत पाटील यांनीही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितील आहे. (Jayant PAtil appeal to the Supreme Court) या अपात्रतेच्या याचिकांवर आज सुनावणी पार पडणार  आहे.

गेल्या वेळी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राहुल नार्वेकर यांच्याकडे सर्व खरी कागदपत्रे मागितली होती. तर दुसरीकडे या संदर्भातील सुनावणी  सर्वोच्च न्यायालयात न होता उच्च न्यायालयात करण्यात यावी अशी मागणीही भरत गोगावले यांनी केली होती. (BHarat Gogavle on hearing ) पण या सर्व परिस्थितीत राज्यातील विधानसभा निवडणुकाही होणार असल्याने न्यायालय काय निर्णय देते, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

Latest Posts

Don't Miss