Saturday, January 18, 2025

Latest Posts

| TOR News Network |

Supriya Sule Latest News : यंदाच्या निवडणुकीत परत एकदा जुन्या मुद्द्यांवरुन सत्ताधारी-विरोधक आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत.आता सध्या सिंचन घोटाळ्यावरून राजकारण तापले आहे. याच प्रकरणावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी असणाऱ्या, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. (Supriya sule on Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांनी फाईल का दाखवली,? असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी आपण फडणवीसांवर केस करणार असल्याचं वक्तव्य करत त्यांना थेट इशाराच दिला. (Supriya warning to fadnavis) आपण फक्त निवडणूक संपण्याची वाट पाहत असून, त्यानंतर फडणवीसांवर केस करणार असल्याचा इशारा देत त्यांनी जाहीर माफी मागावी अशी थेट मागणीच सुप्रिया सुळे यांनी केली.

फडणवीसांनी अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. किंबहुना अजित पवार यांना फाईल दाखवल्याचं अजित पवार स्वत: भाषणात म्हणाले, पण अजित पवारांना उपमुख्यमंत्र्यांनी फाईल दाखवलीच कशी? असा संतप्त सूर आळवत निवडणूक संपताच आपण फडणवीसांवर केस करणार असल्याचा थेट इशारा सुळेंनी देत पदभार स्वीकारताना घेतलेल्या शपथीचं स्मरण त्यांनी फडणवीसांना करून दिलं.

आपण जेव्हा पद आणि गोपनीयतेची शपथ घेतो, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असतो तेव्हा फाईल्स दाखवण्याचा अधिकार कोणाकडेच नसतो. ज्या व्यक्तीवर तुम्ही केस करता त्या व्यक्तीला बोलवून फाईल दाखवल्या जातात हे कितपत योग्य आहे? असा खडा सवाल करत फडणवीसांना राज्याला उत्तर द्यावंच लागेल असं परखड वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं.

Latest Posts

Don't Miss