| TOR News Network |
Mahavikas Aghadi Latest News : महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आता विधान सभेच्या तयारी कडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे.मात्र लोकसभेत मिळालेले यश बघता महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ -छोटा भाऊवरून वाद सुरु झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना 288 जागांवर तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. (UBT to Fight on 288 seats in vidhansabha) अशात आता काँग्रेसमध्येही स्वबळाचा नारा घुमू लागला आहे. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने महाविकास आघाडीने 288 जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचं विधान केलं आहे.(congress to contest 288 seats in vidhansabha) त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधासनभा निवडणुकीत महाविकास आघाडी राहणार की जाणार? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.(Trouble in Mahavikas Aghadi on seat sharing)
काँग्रेस नेते अभिजीत वंजारी यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेनंतर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Abhijeet wanjari on vidhansabha)विधानसभा निवडणुकीत काय करायचं हा प्रश्न आमच्या लेव्हलचा नाहीये. महाविकास आघाडीचे नेतेच ते ठरवतील. पलिकडे तीन पक्ष आहेत. इकडेही तीन पक्ष आहेत. जागा वाटप करताना अनेकदा चांगल्या कार्यकर्त्यांचं नुकसान होतं. त्यामुळे जर 288 जागांवर मैत्रीपूर्ण लढत देण्याचा विचार आला तर नक्की लढलं पाहिजे, (Will Contest vidhansabha in friendly weather) असं अभिजीत वंजारी यांनी म्हटलं आहे.
288 जागा लढवण्यासाठी काँग्रेसकडे तेवडे उमेदवार आहेत का? असा सवाल वंजारी यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. आमच्याकडे 288 जागांवर लढण्यासाठी उमेदवार आहेत.(We Have 288 candidate in congress) आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. सर्वाधिक संख्या असलेला पक्ष आमचा आहे. विलासराव देशमुख यांच्या काळातही आमचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते. आमचं वलय आणि वचर्स्व होतं. 288 उमेदवार मिळण्यास आम्हाला काही अडचण नाहीये, असं अभिजीत वंजारी म्हणाले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. (uddhav thackeray On Vidhan Sabha) यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत जिल्हाप्रमुखांनी घेतलेल्या कष्टाबद्दल अभिनंदन केलं. विधानसभा निवडणुका अवघ्या चार महिन्यावर आहेत. दिवस फार कमी आहे. त्यात पाऊस आणि शेतीची कामेही आहेत. असं असलं तरी आपली संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागा.(Get Ready For vidhansabha) आतापासूनच विधानसभेची तयारी करा.(uddhav thackeray to Party Workers) सर्वच्या सर्व 288 मतदारसंघांची तयारी करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यामुळे काँग्रेसमधून ही प्रतिक्रिया उमटली आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आता विधान सभेच्या तयारी कडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे.मात्र लोकसभेत मिळालेले यश बघता महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ -छोटा भाऊवरून वाद सुरु झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना 288 जागांवर तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. (UBT to Fight on 288 seats in vidhansabha) अशात आता काँग्रेसमध्येही स्वबळाचा नारा घुमू लागला आहे. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने महाविकास आघाडीने 288 जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचं विधान केलं आहे.(congress to contest 288 seats in vidhansabha) त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधासनभा निवडणुकीत महाविकास आघाडी राहणार की जाणार? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.(Trouble in Mahavikas Aghadi on seat sharing)