Sunday, January 12, 2025

Latest Posts

महायुतीत नक्की काय सुरू : बैठकीला राष्ट्रवादीचा एकही नेता फिरकला नाही

| TOR News Network |

Mahayuti Latest News : निवडणुकीतून सपाटून मार खाल्ल्यानंतर एकमेकांकडे बोट दाखवण्यात येत आहे. त्यात राष्ट्रवादीने भाजपचे काम केले नाही असाही सुर लावला जात आहे. (Big Claim on Ncp) त्यात भर म्हणून की काय केंद्रीय मंत्रिमंडळातही राष्ट्रवादीला स्थान देण्यात आले नाही. (No Cabinet to Ncp) पुढे सुनेत्रा पवारांचा राज्यसभेचा अर्ज दाखल करतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिसले नाहीत. आता आगामी अधिवेशनासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एकही नेता फिरकला नाही. त्यामुळे महायुतीत नक्की काय सुरू आहे याची जोरदार चर्चा राजकीय वर्तूळात सुरू आहे. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन होवू घातले आहे. (Monsoon Session)

त्यासाठी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या बैठकील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एकाही नेत्याने हजेरी लावली नाही. अजित पवार, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील पुण्यात होते. राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने इतक्या महत्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याने वेगवेगळ्या चर्चा मात्र राजकीय वर्तूळात केल्या जात आहेत. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहे का? अशीही चर्चा सुरू आहे. (Ncp Restless in mahayuti) या बैठकीला विरोधपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ऑनलाईन हजेरी लावली होती. तशीच हजेरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही लावता आली असती. मात्र तसे झाले नाही.

लोकसभा निवडणूक निकालानंतर महायुतीत सर्व काही आलबेल आहे असे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने काम केले नाही असाही आरोप केला जात आहे. यावर चर्चा सुरू असताना केंद्रीय मंत्रिमंडळातही अजित पवार गटाला स्थान मिळाले नाही. कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी असताना राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली. ती ऑफर राष्ट्रवादीने फेटाळली. वेट अँण्ड वॉचच्या भूमीकेत राष्ट्रवादी गेली. (Ncp Stand for Wait And Watch) त्यानंतर राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करण्यात आला. मात्र तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे अनुपस्थित राहीले. आता कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अजित पवारांनी दांडी मारली.(Ajit Pawar Absent in Advisory committee meeting) त्यामुळे हे चित्र पाहिल्यानंतर महायुतीत नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत नाराज आहे का? अजित पवार सध्या महायुतीत एकटे पडले आहेत का? हे प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला गैरहजर होते. याबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.(Rahul narvekar news) बैठकीला ते येणार नव्हते याची कल्पना आपल्याला होती. बैठकीला गैरहजर राहण्याची परवानगी त्यांनी मागितली होती असे नार्वेकर म्हणाले.

Latest Posts

Don't Miss