गारठा कायम राहणार, हवामान राहणार कोरडे
Weather News Maharashtra 2023 : पुढील पाच दिवस राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पुढील पाच दिवस उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव कायम राहणार असल्यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार आहे. (Cold Temperature Will Rise in Vidharbha in next 48 hours)
राज्यात आता अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यातील अनेक शहरांचे तापमान सातत्याने 10 ते 12 अंश सेल्सिअस दरम्यान आले आहे. वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागासह शहरी भागात शेकोट्या पेटविल्या जात आहे. आता हवामान विभागाने थंडीसंदर्भात अपडेट दिले आहे. पुढील 48 तासांत महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. थंडीचा हा जोर वर्षाच्या अखेरपर्यंत कायम राहणार आहे. अरबी समुद्रात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे थंडी निर्माण झाली आहे. सध्या उत्तरेकडे थंड वारे सुरु असून त्याचा प्रवास राज्याचा दिशेने सुरु झाला आहे. या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. थंडी आणण्यासाठी कमी दाबक्षेत्रेही सध्या मध्य प्रदेशसह महाराष्ट्रात अस्तित्वात येत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात ही थंडीचा प्रभाव जाणवत आहे. पुणे शहराचे तापमान १४. ९ अंशावर आहे. राज्यात सर्वात कमी तापमान विदर्भात नोंदवले गेले. गोदिंयाचे तापमान 9 अंश सेल्सियस होते. मुंबईतील तापमान 22.3 अंशावर आले असली तरी सकाळी गार वारे वाहत आहेत. यामुळे समुद्र किनारी फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नागपूरचे तापमान 10.5 तर नाशिकचे तापमान 13 अंश सेल्सियस नोंदवण्यात आले.राज्यभरात कोरडे वातावरण आहे. पुढील पाच दिवस उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गारठा कायम राहणार आहे. दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी रात्री किंवा पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे.