Thursday, January 16, 2025

Latest Posts

मुसळधार पावसाचा इशारा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

| TOR News Network |

Maharashtra Rain Updates News :  राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार सुरु असणाऱ्या पावसाचा जोर आता काही जिल्ह्यात ओसरला आहे. मात्र काही भागांत अजूनही मुसळधार पाऊस सुरु आहे. तर मुंबई, ठाण्यात पावसाची संततधार कायम आहे. (Rain In Mumbai Thane) हवामान विभागाने आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, पुणे, कोल्हापूर, सातारा, मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.(Yellow Alert In Maharashtra )

 रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.(Rain In Vidharbha) यासोबतच हवामान विभागाने मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुण्यात काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: पुण्यातील पुरस्थितीचा आढावा घेतला होता. पुण्यातील जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे. आज हवामान विभागाने पुण्याला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.(Rain Yellow Alert to Pune) पुण्यात पुढील 4 ते 5 दिवस तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात 11 ऑगस्टपर्यंत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे 8 ऑगस्टला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना व विजांच्या कडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.(Next 5 Days Rain In vidharbha) त्यामुळे विदर्भासाठी पुढील चार ते पाच दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Latest Posts

Don't Miss