Monday, November 18, 2024

Latest Posts

उद्या मतदान : त्यापूर्वी राज्यात ‘हॉटेल डिप्लोमसी’

| TOR News Network |

Vidhan Parishad Latest News :  उद्या  विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. (Vidhan parishad Voting news ) या निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात उतरले आहेत. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी व मतांची फाटाफूट टाळण्यासाठी सर्व पक्षांच्या त्यांच्या आमदारांना हॉटेलमधील ठेवले आहे. (Maharashtra Mla At Hotel) या विधान परिषदेच्या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. (Vidhan PArishad Cross Voting) तसंच हे गुप्त मतदान असल्यानं घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळंच सावधगिरीचा पर्याय म्हणून राजकीय पक्षांनी आता हॉटेल डिप्लोमसीचा अवलंब केलाय. (Vidhan Parishad Hotel diplomacy) उद्धव ठाकरे गट, अजित पवार गट, भाजपा, शिंदे गट यांनी आपल्या आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्या सर्व आमदारांना कुलाबा परिसरातील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये ठेवले आहे. काल रात्री विधिमंडळात भाजपच्या आमदारांची बैठक पार पडली. (Bjp Meeting For Vidhan Parishad) त्यानंतर या आमदारांना हॉटेल प्रेसिडेंटमध्ये ठेवण्यात आले आहे. आज आणि उद्या अशा दोन्हीही दिवस सर्व आमदारांना याच हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या आमदारांची रंगीत तालीम घेण्यात आली. भाजपाच्या आमदारांनी कोणत्या पसंतीचं कशी मते द्यावीत याच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या आहेत. (Instructions given to Bjp Mla) शिवाय, कोणाचं मतदान वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही वरिष्ठांकडून सर्व आमदारांना देण्यात आल्या.

आगामी निवडणुकीत ठाकरे गटाकडून आमदारांची विशेष काळजी घेतली जात आहे. ठाकरे गटाने त्यांच्या सर्व आमदारांना आयटीसी ग्रँड सेंट्रलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी सर्व आमदारांना खेळीमेळीच्या वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेही आमदारांसोबत राहणार आहेत.(Aditya Thackeray With all Mla) तसेच या सर्व आमदारांच्या राहण्याची व्यवस्था एकाच मजल्यावर करण्यात आली आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने नऊ उमेदवार उभे केले आहेत. विरोधी महाविकास आघाडीचे तीन उमेदवार रिंगणात आहेत.(Mahavikas Aghadi Mla) पाच उमेदवारांसह भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले आहेत. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला आहे. शरद पवार गटाने भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

महायुतीमध्ये भाजपचे 103, शिवसेनेचे 40 आणि राष्ट्रवादीचे 40 आमदार आहेत. महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) 1 आमदार, बहुजन विकास आघाडी 2 आमदार असलेल्या एनडीएचा भाग आहे. प्रहार जनशक्ती पक्ष 1, इतरांसह, महायुतीचा वाटा 203 वर आहे. महाविकास आघाडीकडे काँग्रेस (37), शिवसेना ठाकरे गट (16), राष्ट्रवादी शरद पवार गट (12), समाजवादी पक्ष (2), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (1) आणि शेतकरी आणि कामगार पक्ष अशा 69 आमदारांचा पाठिंबा आहे. विधानपरिषदेच्या 11 सदस्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ 27 जुलै रोजी संपणार आहे, त्या जागा भरण्यासाठी निवडणूक आवश्यक आहे.

Latest Posts

Don't Miss