Thursday, January 23, 2025

Latest Posts

सांगलीत काँग्रेस नेता विशाल पाटील बंड पुकारणार 

| TOR News Network | Sangli Politics Latest News : सांगलीत काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या निर्णयाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. सांगली या हक्काच्या जागेवर ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. (Chandrahar patil  from sangli) त्यामुळे सांगलीत काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले असून विशाल पाटील यांच्या उमेदवारी बाबत आज सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. (congress meeting in sangli) या बैठकीमध्ये विशाल पाटलांच्या (Vishal patil sangli news) अपक्ष उमेदवारीबाबत शिक्कामोर्तब आणि जिल्हा काँग्रेसची भूमिका स्पष्ट होण्याची देखील शक्यता आहे. (Vishal patil to contest independent from sangli)

महाआघाडीकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील आणि ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील दोघेही आग्रही होते. परंतु सांगलीची जागा सेनेला गेल्यामुळे जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. (In sangli Congress workers Aggressive) काल मिरज तालुक्यातील काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव सुद्धा घेण्यात आला आहे.

सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीवरील काँग्रेस हे नाव काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुसले आहे. त्यांनी आपला निषेध व्यक्त करत विशाल पाटील यांनी अपक्ष उभे राहावे अशी मागणी देखील केलेली. (Vishal patil to contest independent from sangli) सांगलीमध्ये राजकीय वातावरण तापलेलं असल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे.सांगलीमध्ये आज काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सांगलीच्या जागेवर कॉंग्रेसने दावा केला होता. परंतु शिवालय कार्यालयामध्ये महाविकास आघाडीची तसेच इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. तेव्हा महाआघाडीकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी झाली होती.

विशाल पाटील आता लोकसभा निवडणूक अपक्ष लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेतल्याचं समोर आलं होतं. परंतु कोणतीही अधिकृत घोषणा त्यांच्याकडून करण्यात आलेली नाही. आज होणाऱ्या बैठकीनंतर हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आजच्या या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागेललं आहे.(Sangli congress workers meeting today)

Latest Posts

Don't Miss