Thursday, January 16, 2025

Latest Posts

पुणे अपघातात चालकाला डांबून ठेवले व बंगला देण्याचे आमीष

| TOR News Network |

Pune Car Accident News : पुणे येतील बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने पोर्श गाडी चालवत दोघांना उडवले होते. या अपघातानंतर पुणे पोलिसांच्या भूमिकेनंतर चौफेर टीका झाली. त्या टीकेनंतर पुणे पोलीस खळबळून जागे झाले आहे. अग्रवाल कुटुंबियाविरोधात तक्रारी असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी सातवी अटक केली आहे.(Pune Police 7th Arrest in Car Accident case)

अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणात यापूर्वीच अटक झाली होती. आता विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांनाही गुन्हे शाखेने अटक केली आहे. (Surendra Agrawal Arrested) पुण्यातील अपघात प्रकरणात ही सातवी अटक आहे. चालकाला डांबून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. (Surendra Agrawal Hide Driver) या आधी पुणे पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी केली होती. तसेच विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांची समोरासमोर चौकशी झाली होती. सुरेंद्र अग्रवाल याच्या विरोधात येरवडा पोलिसांनी अपहरणाचे कलम लावले आहे. कलम 365 आणि 368 कलम लावले आहे. त्यांनी दोन दिवस ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

अपघात घडला तेव्हा पोर्श गाडी आपण चालवत होतो, असा जबाब पोलिसांना देण्यासाठी विशाल अग्रवाल यांनी चालकाला पैशांची ऑफर दिली होती.(Vishal Agrawal offer money to driver) परंतु विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र अग्रवाल त्यापुढे गेले. त्यांनी हवा तसा जबाब देण्यासाठी चालकाला डांबून ठेवले.

अपघात झाल्यानंतर चालक दोन दिवस बेपत्ता होता.(Driver was missing for two days) कारण अपघातानंतर सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी चालकाचे अपहरण करत डांबून ठेवले होते. बंगला देतो असे अमिष दाखवत अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यासाठी दबाव टाकला होता. (Vishal agrawal pressued on Driver) त्या चालकाचे मोबाईल फोन काढून घेत दोन दिवस डांबून ठेवले होते. त्यानंतर चालकाने कसातरी पत्नीला फोन करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली.(Driver called wife) चालकाच्या पत्नीने पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी संबंधित चालकाची सुटका करत सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Latest Posts

Don't Miss