Saturday, November 16, 2024

Latest Posts

या पक्षासाठी विरेंद्र सेहवाग उतरला निवडणुकीच्या पीचवर

| TOR News Network |

virender sehwag Latest News : अगदी पहिल्या चेंडूपासून स्फोटक फलंदाजी करणारा टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आता राजकारणाच्या पीचवर उतरला आहे. (virendra sehwag on political pitch) हरियाणामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचा जोरात प्रचार सुरु आहे. हरियाणामध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी येत्या 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे.(Haryana election voting on 5 october latest news) वीरुनेही तेथील एका उमेदवाराचा प्रचार केला आहे. तोशाम येथून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारासाठी त्याने प्रचार केला असून उमेदवाराला विजयी करण्याचं तोशामच्या जनतेला आवाहन केलं आहे.

विरेंद्र सेहवाग  काँग्रेसचे उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांच्यासाठी मत मागत आहे.(Sehwag appeal vote for congress) त्यासाठी अनिरुद्ध चौधरीने सेहवागचे आभार मानले. विरेंद्र सेहवाग आणि अनिरुद्ध चौधरी यांची जुनी ओळख आहे.(Aniruddha choudhary virendra sehwag) दोघेही जेव्हा भेटतात, तेव्हा क्रिकेटपेक्षा पर्सनल लाइफबद्दल जास्त चर्चा होते. अनिरुद्ध चौधरी आपल्यासाठी मोठ्या भावासमान असल्याच विरेंद्र सेहवाग म्हणाला. अनिरुद्ध चौधरी यांनी जनतेला जी आश्वासने दिलीयत ती ते नक्की पूर्ण करतील असा विश्वास सेहवागने बोलताना व्यक्त केला. (Sehwag on aniruddha choudhary) अनिरुद्ध चौधरी निवडणूक जिंकले, तर जनतेला ते नाराज करणार नाही असं सेहवाग म्हणाला.

तोशामची जनता आपल्याला स्वीकारणार असा अनिरुद्ध चौधरी यांना पूर्ण विश्वास आहे. विरेंद्र सेहवागने जो प्रचार केला, त्याचा किती फायदा झाला ते येत्या 5 ऑक्टोंबरला समजेल. विरेंद्र सेहवागच्या क्रिकेट करियरबद्दल बोलायच झाल्यास त्याने भारतासाठी 374 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात 38 शतकं आणि 17 हजारपेक्षा जास्त धावा आहेत. सेहवाग सलामीला यायचा. सेहवागच्या आवाहनानंतर अनिरुद्ध चौधरी यांचा चंदीगडला जाण्याचा रस्ता खुला होणार का? ते लवकरच कळेल.

Latest Posts

Don't Miss