Saturday, January 11, 2025

Latest Posts

पाकिस्तान जिंदा भाग

यंदाच्या विश्वचषकात भारताने केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारत गुण तालिकेत प्रथम क्रमांकावर कायम आहे.तर दुसरीकडे पाकिस्तानची उपांत्या फेरी गाठण्याचे स्वप्न जवळपास भंगले आहे.अशात भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने एक्सवर एक पोस्ट टाकत पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली आहे. (Virender Sehwag tweets on Pakistan WC 2023)

विश्वचषक आता अंतिम टप्पायकडे वाटचाल करत आहे.अशात पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यात यश येता का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.मात्र आता तीही शक्यता धूसर झाली आहे.तरी पण पाकिस्तानला एक कठीण संधी आहे.त्यसाठी पाकिस्तानला आपल्या अखेरच्या सामन्यात इंग्लंड विरुध्द प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली तर त्याला इंग्लडच्या संघाचा २७५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करावा लागेल. त्याची फलंदाजी नंतर आली, तर इंग्लडने दिलेले लक्ष्य अवघ्या अडीच षटकांत गाठावे लागेल. तर पहिले फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानने 300 धावा केल्या तर इंग्लंडला 13 धावात गुंडाळावं लागेल.तर इतर पर्याय मध्ये जर पाकिस्तानने 400 धावा केल्या तर इंग्लंडला 112 धावात गुंडाळावं लागेल.जर पाकिस्तानने 450 धावा केल्या तर इंग्लंडला 162 धावात गुंडाळावं लागेल.जर पाकिस्तानने 500 धावांची विक्रम केला तर इंग्लंडला 211 धावात गुंडाळावं लागेल.मात्र हे पाकिस्तानसाठी मोठे अवघड आहे.त्यामुळे पाकिस्तान आता पॅक अपच्या दिशेने आहे.अशातच विरेंद्र सेहवाग यांने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. यात पाकिस्तान जिंदाभाग घरी परतण्यासाठीचा विमान प्रवास सुरक्षित होवो असे कॅप्शन देत सेहवागने बाय बाय पाकिस्तान असा मजकूर असलेला फोटो शेअर केला आहे.

Latest Posts

Don't Miss